घरCORONA UPDATEकोरोना महामारीत वृध्दांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम ; संशोधनात आले समोर

कोरोना महामारीत वृध्दांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम ; संशोधनात आले समोर

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. या कोरोना महामारीची झळ लहानांपासून-मोठ्यांपर्यंत पोहचली आहे. मात्र, प्रामुख्याने या कोरोनाच्या काळात बहुतांश वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. कारण या महामारीत वृद्धांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांची लक्षणं आढळून आली आहेत, असे वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर केलेल्या एका संशोधनात आढळून समोर आले आहे. ‘नेचर एजिंग’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठानं केलेल्या निष्कर्षावरुन ही बाब समोर आली आहे. ५० वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या ४३ टक्के वृध्दांना मोठ्या प्रमाणात नैराश्य आल्याचे पाहायला मिळत आहे.संशोधन करणाऱ्या टीमने टेलिफोन आणि वेब सर्व्हे डेटाचा वापर करुन,कोरोना महामारीत नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास केला, असे मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे संशोधक परमिंदर रैना यांनी सांगितले.

या नव्या संशोधनानुसार, महामारीच्या काळात कौटूंबिक वाद-विवाद,कुटुंबापासून वेगळं होणं,वृद्धांमध्ये काळजी घेण्याची जबाबदारी,एकटेपणा यासारखे वृध्दांच्या मानसिक आजारावर परिणाम करणारे घटक समोर आले. याशिवाय संशोधनात असेही आढळून आले की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. ताणतणावातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

- Advertisement -

 ‘ही’ आहेत  नैराश्याची लक्षणे…

या व्यक्ती नेहमी कोणत्यातरी विचारात असतात.

प्रत्येक वेळी बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात.

- Advertisement -

भविष्याबद्दल हताश होऊन, या व्यक्तींचे निराशावादी बोलणे असते

लगेच  चिडचिड आणि अस्वस्थ होतात. स्वतःला निरुपयोगी समजतात,

कशाचीही काळजी घेत नाहीत.

अनेकदा मृत्यू आणि आत्महत्येबद्दल विचार करतात.

कोणत्याही गोष्टीत आनंद अनुभवत नाहीत.

कशावरही लक्ष केंद्रित करत नाहीत.

 

 


 हे ही वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंवर रुग्णालयात उपचार, सरकारला मात्र कोविड,केंद्रीय एजन्सीने घेरलयं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -