Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Treatment : कोरोना रूग्णावर उपचारा दरम्यान घरातले वेंटीलेशन कसे असावे?...

Corona Treatment : कोरोना रूग्णावर उपचारा दरम्यान घरातले वेंटीलेशन कसे असावे? AC टेम्परेचर किती ठेवाल ?

घरातील वेंटिलेशन कसे असले पाहिजे?

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयातही रुग्णांसाठी जागा नाही. त्यामुळे बरेच जण आता घरीच राहून उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरी राहून डॉक्टरांच्या निगराणीत उपचार दिले जातात. मात्र घरी राहून उपचार घेतना आपण आपली योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बरेच जण घरी राहून आम्हाला योग्य काळजी घेता येईल का या अशा भितीत असतात. त्यामुळे ते रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. मात्र सद्य परिस्थितीत ज्यांना कमी लक्षणे आहेत असे रुग्ण घरी राहून उपचार घेऊ शकतात. फक्त त्यासाठी थोडी सतर्कता ठेवून काळजी घेणे महत्त्वाचे. कोरोनाच्या दरम्यान रुग्णावर घरी राहून उपचार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? प्रामुख्यांने घरातील वेंटिलेशन कसे असले पाहिजे? बऱ्याच जणांच्या घरी AC असते. कोरोनावर उपचार घेताना ACचा वापर करावा का ? त्याचे टेम्प्रेचर किती असावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

आपल्याकडे आजही अनेक जण कोरोना झाल्यानंतर होमक्वारंटाईन असताना घराच्या दरवाजे,खिडक्या बंद करुन घरात राहतात. दारे खिडक्या बंद केल्याने आपण संसर्गातून बरे होऊ असे अनेकांना वाटत असते. मात्र असे नाही. घरातील हवा जितकी खेळती असेल तितकेच तुमची आजारातून बाहेर येण्याची लक्षणे अधिक असतील.

कोरोना रुग्णावर घरी उपचार करताना घरचे वेंटिलेशन कसे असावे?

    • घरातील वातावरण खुले ठेवण्यासाठी घराचे दरवाजे सतत उघडे ठेवा.
    • घरातील पंखे चालू ठेवा.
    • घरातील ACचे टेम्प्रेचर हे २४ डिग्री सेल्सियस ते ३० डिग्री सेल्सियसच्या मध्ये ठेवू शकता.
- Advertisement -

घरी कोरोनावर रुग्णावर उपचार सुरु असताना घरा स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर योग्य औषधे घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपण कोरोनाची लढाई यशस्वीरीत्या लढू शकतो.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुक्तीनंतरही चव लागत नाही, वास येत नाही ? समोर आले कारण

 

 

 

 

- Advertisement -