घरलाईफस्टाईलअल्कोहोल सूंघल्याने कोरोना बरा होतो, संशोधकांचा अजब दावा

अल्कोहोल सूंघल्याने कोरोना बरा होतो, संशोधकांचा अजब दावा

Subscribe

रोना रुग्णांच्या उपचारांसाठी सध्या नवनवीन पद्धती शोधून काढली जात आहे. यात कोरोनापासून वाचण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर सध्या केला जात आहे. मात्र यात अल्कोलोहपासून कोरोना बरा होतो असा दावा केला तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हे खरे आहे. एका संशोधनात अल्कोहोल सूंघल्याने कोरोना बरा होतो असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत सध्या अल्कोहोलचा वास घेऊन कोरोनावर प्रभावी उपचार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. आतापर्यंत या प्रयोगाच्या तीन टप्प्यांचे निकाल समोर आले आहेत.  यामुळे वैज्ञानिकांमध्ये या उपचार पद्धतीबद्दल खूप उत्सुकता आहे. कारण आतापर्यंतच्या चाचणीत काही मिनिटांतच अल्कोहोलचा वास घेऊन रुग्णाला श्वासोच्छवास घेताना खूप आराम मिळत आहे.

अल्कोहोलची वाफ घेण्याचा उपाय व्हायरसचा खात्मा करण्यासाठी खूप जुना आहे. मात्र, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले तर अल्कोहोलची वाफ किंवा वास घेणे आणि त्यात यश मिळणे हे पहिल्यांदाच समोर आले आहे. या प्रयोगाला सार्वजनिक वापरासाठी परवानगी मिळल्यास खरोखरच वैद्यकीय क्रांती होईल. असे मत या प्रयोगावर काम करणारे वैज्ञानिक व्यक करत आहेत.

- Advertisement -

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या सेंटर फॉर ड्रग इव्हॅल्यूएशन अँड रिसर्चमध्ये हा शोध पुढे गेला आहे. दिल्लीतील वैज्ञानिक शक्ति शर्मा यांनी याबाबतचे पत्र अमेरिकन एफडीएमध्ये पाठविले आहे.
या शर्मा यांना एफडीएकडून उत्तर आले आहे. या तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरसवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच अल्कोहोलचा वास किंवा वाफ घेऊन कोरोनावर मात केली जाऊ शकते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ बेसिक अँड क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या डॉ. सैफुल इस्लाम यांच्या संशोधनानुसार, इथिल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल इनहेलिंग सूंघल्याने त्याचा परिणाम नाकातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. कोरोना विषाणू केवळ नाकातून घशात आणि घशातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. ६५ टक्के अल्कोहोल सोल्यूशन्सला थेट किंवा ऑक्सिजनद्वारे किंवा नाकातून फुफ्फुसांमध्ये श्वास पोहवले जाते. सामान्य तापमानात सूर्यापासून दूर ठेवलेल्या ६५ टक्के अल्कोहोलयुक्त रसायनं प्रति मिनिट ३.६ मिलीग्राम प्रमाणात ऑक्सिजनद्वारे श्वास घेण्यात आले. दररोज ४५ मिनिटे कोरोनाच्या गंभीर संक्रमित रूग्णांवर ही उपचाार पद्धती वापरण्यात आली. हा प्रयोग कोरोनाच्या गंभीर लक्षणांशी सामना करणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती पुन्हा वाढण्याबरोबरचं फुफ्फुस आणि घशातील कोरोना संसर्ग दूर करण्यासाठी यशस्वी ठरलेल्याचे समोर आले आहे. तसेच रुग्णाच्या शरीरातील फायब्रोलाइट्स, न्युट्रोफिल्स तसेच ल्युकोसाइट्सवर सकारात्मक परिणाम झाला.

- Advertisement -

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा: २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई नाही


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -