Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus Symptoms: थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय, ही तर कोरोनाचा नव्या स्ट्रेनची लक्षणे

Coronavirus Symptoms: थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय, ही तर कोरोनाचा नव्या स्ट्रेनची लक्षणे

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. यात भारतात कोरोनाचा B.1.617 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. आधीच अनके कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन, बेड्स, प्लाझ्मा, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर अभावी मृत्यूमुखी पडत असल्याने आरोग्य व्यवस्था अशा रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय, तर दुसरीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आरोग्य व्यवस्थेचा ताण अजून वाढत आहे. यात नागरिकांनाही कोरोनाचा नव्या स्ट्रेनची काय लक्षणे आहेत हे समजण्यास अडचणी येत आहेत. नेहमीचा ताप, सर्दी, खोकला, चव न येणे, वास न येणे यांच्यासह बरीच नवीन लक्षणे नागरिकांना संक्रमित करत आहेत.

नवीन लक्षणे ठरतायत घातक 

दरम्यान देशात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन शरीरास अधिक घातक आहे. या स्ट्रेनववर लशीचाही काही परिणाम होत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतोय. त्यामुळे शरीरात काही नवीन लक्षणे जाणवल्यास किंवा बरे न वाटल्यास दुर्लक्ष करु नका. कारण कोरोना संसर्ग हा फक्त मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांनाच होतो असे नाही तर तरुणांनाही त्याचा सर्वाधिक धोका जाणवत आहे.

- Advertisement -

दरम्यान शरारीत थकवा जाणवणे आणि प्लेटलेटची संख्या अचानक कमी होणे ही हे देखील कोरोनाचा नव्या स्ट्रेनचे लक्षण असल्याचे समोर येत आहे. यावर कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात की, अनेक जण नाकात सुखी सर्दी होत असल्याचा तक्रारी करत असतात. त्यामुळे जर अशक्तपणा, थकवा, ताप आणि घसा सतत कोरडा पडत असेल तर काळजी घ्यावी. तसेच इतरांपासून दूर राहत कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. त्यानंतरही आपण इतरांचा संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. तसेच हिरव्या भाज्या, दुध, फळे असे सकस अन्नपदार्थ खा.

कोरोनाची लक्षणे कोणती?

कोरोना संसर्ग झाला हे ओळखायचे असल्यास काही सामान्य लक्षणे आहेत. यात ताप येणे, शरारीवर चट्टे उठणे, गंध न येणे, चव न लागणे, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसतात. तसेच एका अभ्यासानुसार, डोळे गुलाबी पडणे, गॅस्ट्रोनोमिकल कंडीशन आणि तसेच श्रवणविषयक आजार होऊ शकतात.


- Advertisement -

 

- Advertisement -