घरलाईफस्टाईलCoronavirus:आयुष मंत्रालयनं सांगितले रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत प्रभावकारी उपाय,जाणून घ्या

Coronavirus:आयुष मंत्रालयनं सांगितले रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत प्रभावकारी उपाय,जाणून घ्या

Subscribe

अनेक जणांना दिवसा झोप घेण्याची सवय असते. असे न करता रात्री 8 तास संपूर्ण शांत झोप घ्या.

जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांच्या  संख्येत  देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग महत्वाचे आहे. तसेच या  कठीण काळात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे देखील आवश्यक आहे. भारत सरकारच्या अंतर्गत आयुष मंत्रालयाने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काही महत्वाचे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदात हे उपाय अत्यंत प्रभावकारी आणि शरीरासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. तर काय आहेत उपाय आपण जाणून घेऊया.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने संगीतलेले उपाय पुढीलप्रमाणे –

- Advertisement -

1- दिवसातून 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळी नाकात खोबर्‍याचं तेल,गाईच दुधापासून तयार केलेलं तूप आणि तिळाचं तेल घाला.
2- जर तुम्हाला कोरड्या खोकल्या पासून आराम मिळवायचा असेल तर, गरम पाण्याची वाफ घ्या. आणि वाफ घेतांना पाण्यात ओवा,पुदिन्याची पानं किंवा कापरचा वापर करा.
3 – तुळस,दालचीनी,सुंठ,काळा मिरी यापासून तयार करण्यात आलेला हर्बल चहा किंवा काढा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत फायदेशीर आहे. तसेच जर तुम्ही डाइट करत आसणार तर त्यासाठी सुद्धा हा उपाय फायद्याच्या ठरू शकतो.
4- लवंग आणि ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरे सोबत एकत्र मिश्रण करून दिवसातून दोन वेळा खाल्ल्याने खोकला आणि घशातील खवखवीपासून त्वरित आराम मिळतो.
5- आपल्या शरीरासाठी विटामीनचे महत्व सर्वाधिक आहे. लिंबू,आवळ्याचं सेवन केल्यास शरीरातील ‘विटामीन क’ ची कमतरता नाहीशी होते.
6- दिवसभर गरम पाण्याचं सेवन करा. तसेच सकाळ- संध्याकाळ गरम पाण्यात चिमूटभर मीठ आणि हळद टाकून या पाण्यानं गुळण्या करा. असे दररोज केल्यास कोरोना पासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.
7- फक्त घरगुती उपायचं नाही तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज 30 मिंनट योगा,प्राणायाम,मेडिटेशन करणे गरजेचे आहे
8- अगदी साधा सोप्पं उपाय म्हणजे घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं असणाऱ्या अन्नाचं सेवन करा. जेवणार जीरं, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर करा यामुळे नक्कीच रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
9- रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा.
10- दररोज रात्री हळदीच्या दूध प्या आणि एक ग्लास दूधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा. यामुळे शरीराला रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासोबतच अनेक फायदे होतता.
11- दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम सेवन करा. याचे आयुर्वेदात अनेक गुणकारी फायदे असल्याचे संगितले आहेत.
12 – अनेक जणांना दिवसा झोप घेण्याची सवय असते. असे न करता रात्री 8 तास संपूर्ण शांत झोप घ्या.


हे हि वाचा –  शरीरातील अँन्टीबॉडीज कोरोना विषाणूवर कशाप्रकारे मात करतात? लॉजिक वाचा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -