तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना .. हे साधारणत: जगातील सर्वचं जोडप्यांच्या बाबतीत लागू होते. पण, काही जोडपे असेही दिसतात, ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. लग्नानंतर तर याचे प्रमाण अधिक दिसते. लग्नानंतर जर तुमच्यात तुझं माझं येत असेल तर अशाने नात्यावर गंभीर परिणाम होण्यास सुरूवात होते. त्यामुळे नाते टिकविण्यासाठी नात्यात तुझं माझं न करता ‘आपलं’ असं म्हणणे आवश्यक आहे.
जर तुमच्यात सतत तुझं माझं होत असेल तर अशा वेळी तुम्ही शांतपणे विचार करायला हवा. सर्वात पहिले तर तुमच्यात कशा पद्धतीची आणि कशावरून भांडणे होत आहेत. हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
कोणालाही आई- वडींलाबद्दल अपशब्द ऐकायला आवडत नाही. त्यामुळे दोघांनाही पार्टरच्या आई-वडीलांचा मान सन्मान राखायला हवा. यामुळे तुमच्यात तुझं माझं होणार नाही.
अनेक घरामध्ये सासू सूनेचं पटत नसल्याचे आपण पाहतो. याचा परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर दिसू लागतो. त्यामुळे सासूने सूनेला आणि सूनेने सासूला समजून घ्यायला हवे. यामुळे सासू सूनेचे नाते तर सुधारेलच शिवाय नवरा बायकोच्या नात्यामधील ओलावा कमी होणार नाही. परिणामी, तुझी आई, माझे बाबा असे विषय तुमच्यात येणार नाही आणि तुझं माझं होणार नाही.
तुझं माझं नात्यात येण्याला कधी कधी घरखर्च कारणीभूत ठरतो. हल्ली दोघेही कमावणारे असतात. त्यामुळे घरखर्चावरून तुझं माझं होण्यापेक्षा घरखर्च वाटून घ्यावा.
संशय नात्याला संपवू शकते. त्यामुळे नात्यात एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर पार्टनरची एखादी गोष्ट पटत नसेल तर स्पष्टपणे बोलून घ्या. हल्ली बऱ्याच कपलमध्ये तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेर आहे, तू मला वेळ देत नाही या गोष्टीवरून भांडण होते. हे टाळण्यासाठी नात्यात पारर्दशकता असणे आवश्यक आहे.
नात्यात भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, नात्यात जर वारवांर डोमॅस्टीक वॅायलेन्स होत असेल हे योग्य लक्षण नाही. अशावेळी एकतर पार्टनरची समजूत घालायला हवी किंवा एखाद्या इक्सपर्टचा सल्ला घ्यायला हवा.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde