आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे याकरता प्रत्येक आई-वडिल फार काळजी घेतात. त्यासाठी ते मुलांना नेहमीच पौष्टिक अन्नपदार्थ खाऊ घालतात. त्यांच्या खाण्या-पिण्यात कोणतीच हयगय केली जात नाही. अशावेळी अनेकदा लहान मुलांना गायीचे दूध द्यावे की म्हशीचे या विचारात अनेक पालक असतात.
दूध हे अत्यंत महत्त्वाचे प्रोटिन असून कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन पोषक तत्वे दुधातून मिळतात. ज्यामुळे मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते.
लहान मुलांना कोणते दूध द्यावे?
गायीच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असते, ज्यामुळे गायीचे दूध पचायला हलके असते. मात्र, गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा घट्ट असते. त्यामुळे दही , पनीर, खीर, कुल्फी, रसमलाई आणि रसगुल्ला सारखे दुग्धजन्य पदार्थ गायीच्या दुधापासून बनवले जातात.
तर म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास त्यामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त प्रोटीन असतात. मात्र, म्हशीचे दूध लहान मुलांना पचायला जड जाते. त्यामुळे पहिल्या वर्षांपर्यंत लहान मुलांना गायीचे दूध देणे आरोग्यदायी मानले जाते. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा जास्त फॅट असतात, त्यामुळे ते लहान मुलांना दिले जात नाही.
लहान मुलांना गायीचे दूध जास्त प्रमाणात देणे चांगलं मानले जाते कारण हे दूध पचायला हलके आणि बाळाच्या वाढीसाठी आरोग्यदायी असते. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा जास्त पोषक तत्व म्हणजेच प्रोटीन, कॅल्शिअम आणि फॅट असते. त्यामुळे ते लवकर पचत नाही.
हेही वाचा :