हिवाळ्यातील गुलाबी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. पण, गुलाबी थंडी येताना अनेक आजार आणि त्वचेच्या समस्या घेऊन येते. त्वचेच्या समस्यांमध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, पायांच्या टाचांना भेगा पडणे यांसारख्या समस्या सुरू होतात. टाचांना भेगा पडण्याची समस्या तर टाचेचे सौंदर्य हरवतेच शिवाय हे दुखणे असह्य सुद्धा असते. अनेकदा तर अस्वच्छता, चुकीचं स्किनकेअर, कोरडेपणा आणि हार्मोन्समधील बदलाव यामुळे टाचांना भेगा पडतात. त्यामुळे जाणून घेऊयात, टाचांच्या भेगांवरील काही सोपे उपाय,
भेगांवरील सोपे उपाय –
- टाचा फाटल्या असतील तर त्यात घाण अडकणार नाही याची काळजी घ्यावी. फाटलेल्या टाचांमध्ये घाण जमा झाल्यास समस्या अधिक गंभीर होऊ शकतो.
- पायांना दररोज न चुकता मॉइश्चरायजर लावावे.
- दररोज पाय 20 मिनिटे कोमट पाण्यात ठेवावेत. यामुळे पायांना आराम मिळतो.
- टाचांवर तुम्ही केळी स्मॅश करून लावू शकता. फाटलेल्या पायांवर भेगा पडल्यास लावलेला केळीचा मास्क अत्यंत उपयुक्त ठरतो.
- फाटलेल्या भेंगावर क्रॅक हिल क्रिम तुम्ही लावायला हवी. क्रॅक हिल क्रिम टाचांना सुंदर आणि मुलायम बनवते. यासाठी रोज रात्री पाय पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत. यानंतर हलक्या हातांनी क्रीम लावावे.
- घरातील फरशी थंड असते. अशावेळी तुम्ही घरात स्लिपर वापरायला हवी. यामुळे टाचा फाटत नाही.
- तुम्हाला मधाचा वापर करता येईल. मध हे उत्तम मॉइश्चरायजर आहे. मधाच्या वापरामुळे त्वचेचं पोषण होते. यासाठी अर्धा कप मध पाण्यात घाला. या पाण्यात किमान 15 मिनिटे पाय ठेवून बसावे. यामुळे टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.
टाचांना भेगा पडू नयेत यासाठी हे करा –
- टाचांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.
- आठवड्यातून दोन वेळेस टाचा स्क्रबरने अवश्य घासाव्यात.
- टाचा स्क्रबरने घासताना थेट घासू नयेत. आधी कोमट पाण्यात मीठ घालावे आणि त्यात पाय बुडवून ठेवावेत.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde