बऱ्याच लोकांना खारट पदार्थ सतत खावेसे वाटतात. मात्र, शरीरासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.सतत अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण याचे शरीरावर होणारे परिणाम अतिशय वाईट आहेत. पण सतत असे पदार्थ का खावेसे वाटतात? याच्या मागे कारणं आहेत. काय आहेत नक्की यामागील कारणं याची माहिती खास तुमच्यासाठी
सतत खारट खाण्याची सवय ठरु शकते घातक
- डिहायड्रशन झाल्यास
जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलन्स बिघडतो. त्यामुळे त्याला नियंत्रित करण्यासाठी मीठाची गरज असते. पण त्यावेळ मीठ न खाता इलेक्ट्रोलाईट असलेल्या पेयाचा जास्तीत जास्त वापर करावा.
- तणाव
बऱ्याचदा भरपूर तणाव असल्यासदेखील खारट पदार्थ खावेसे वाटतात. तुम्ही तणावात असताना तुमच्या शरीरातून जास्त प्रमाणात सोडियम बाहेर पडतं.
- सोडियमची पातळी घटणे
बऱ्याचदा शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. त्यावेळी जास्त खारटं खावेसे वाटते. काही वेळा जास्त घाम आल्यामुळेदेखील शरीरातील सोडियम कमी होतं. तेव्हा शरीराला जास्त खारट पदार्थाची गरज असते.
- मिनरल्सची कमतरता
शरीरामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमची कमतरता असल्यास देखील सतत खारटं खावंसं वाटतं. त्यामुळं पहिल्यांदा या मिनरल्सच्या कमतरता दूर करणं गरजेचं आहे तरच तुमची खारट खाण्याची भूक शांत होऊ शकते.
- एड्रेनल ग्लँडमध्ये कमतरता
सतत खारट खावंसं वाटत असल्यास, एड्रेनल ग्लँडमध्ये कमतरता असण्याची शक्यता असते. एड्रेनल ग्लँड नीट काम करत नसल्यास, शरीराची ऊर्जा जास्त प्रमाणात कमी होते. त्यासाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :