बऱ्याच जणांना कोबीची भाजी खाण्याचा फार कंटाळा येतो. अशावेळी कोबीच्या भाजीचे काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींनी प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही कोबीचा कुरकुरीत पकोडो नक्कीच करु शकता.
साहित्य :
- 1/2 किलो कोबी
- 1 वाटी तांदळाचे पीठ
- 2 चमचे आलं-लसूण पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट मसाला
- हळद
- मीठ
- तेल
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम कोबी किसून धुवून घ्या आणि त्यानंतर त्यातील पाणी नीतळत ठेवा.
- नंतर राहिलेले पाणी पीळून काढा आणि आता त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, मसाला, मीठ, तांदळाचे पीठ सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.
- त्यानंतर त्याचे छोटे-छोटे गोळे करुन मंद आचेवर तळून घ्या.
- हे पकोडे शेजवान सॉंस बरोबर सर्व्ह करा.
हेही वाचा :