नाश्तासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी क्रिस्पी सोया कटलेट

नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर क्रिस्पी सोया कटलेट ही रेसिपी त्याला उत्तम पर्याय ठरू शकते.

नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर क्रिस्पी सोया कटलेट ही रेसिपी त्याला उत्तम पर्याय ठरू शकते. खाण्यासही टेस्टी आणि यात प्राोटीनयुक्त सोयाबीन असल्याने हे कटलेट तब्येतीसह फायदेशीर असतात.

साहीत्य- अर्धा कप सोयाबीनचा चुरा, पाव कप चना डाळ, पाव कप कुस्करलेला उकडलेला बटाटा. १ लहान चमचा आले, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जीरे पावडर, एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप ब्रेड क्रम्स, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ.

कृती-सर्वप्रथम चना डाळ एक तास पाण्यात भिजवावी, सोयाबीनचा चुराही अर्धा तास पाण्यात भिजवावा. नंतर दोन्ही जिन्नस पाण्यातून बाहेर काढावे. प्रेशर कुकरमध्ये सोयाबीनचा चुरा आणि चना डाळ एक कप पाणी टाकून शिजवून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये टाकावे त्यात धने जिरे पावडर, मिरची, लसून पेस्ट, मीठ, गरम मसाला,कोथबिंर टाकून एकत्र करावे. या मिश्रणाचे हातावर दाबून गोलाकार कटलेट बनवावे. फ्राय पॅनमध्ये तेल टाकून त्यात हे कटलेट गरम गरम शॅलो फ्राय करावेत. सॉस किंवा पुदीना चटणीबरोबर खाण्यास द्यावे.