घरलाईफस्टाईलचमकदार त्वचेसाठी काकडीचे घरगुती फेस पॅक

चमकदार त्वचेसाठी काकडीचे घरगुती फेस पॅक

Subscribe

उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी काकडी चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी ही चेहर्‍यावर चमक आणते. काकडीपासून आपण घरच्या घरी फेस पॅक तयार करु शकतो.

  • काकडी घेऊन तिचे बारिक काप करुन घेणे. त्यानंतर त्यात १ चमचा ओट्स, १ चमचा दही आणि १ चमचा मध एकत्र करुन मिक्सरमध्ये फिरवून घेणे. हा तयार झालेला पॅक चेहरा आणि मानेवर २० मिनिट लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन घ्या.
  • काकडीची पेस्ट तयार करुन घेणे. त्यात लिंबाचा रस आणि अंड्याचा पांढरा भाग मिसळा. हे तयार मिश्रण ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल.
  • प्रथम काकडीची पेस्ट तयार करुन त्यामध्ये ५ चमचे मध आणि लिंबाचा रस मिसळून एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्या पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून १५ मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा यामुळे चेहरा चमकतो.
  • मुलतानी मातीमध्ये ३ चमचे काकडीचा रस व १२ थेंब गुलाबपाणी मिळून मिश्रण एकत्र करुन घेणे. हा तयार पॅक १४ मिनिटे त्वचेवर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्स नाहीसे होतात.
  • काकडीच्या रसात १ चमचा एलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल.
  • २ चमचे बेसनमध्ये २-३ चमचे काकडीचा रस मिसळा. हे मिश्रण २० मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. नंतर गरम पाण्याने चेहरा धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग दूर होतील.
  • काकडीच्या पेस्टमध्ये दही मिसळा. चेहर्‍यावर या मिश्रणाने मालीश करा. १०-१५ मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हे ड्राय स्कीनवर उपयोगी ठरेल. तसेच पिंपल्सची समस्याही सुटेल.
  • काकडी आणि ओट्सची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. डेड स्कीनसाठी हे फायदेशीर ठरेल.
  • काकडी आणि टोमॅटो मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटाने गार पाण्याने चेहरा धुऊन टाका याने त्वचा उजळेल.
Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -