स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये जिऱ्याचा समावेश असतो. फोडणी देण्यापासून ते पदार्थाची चव वाढवण्यासाठी जिरे वापरले जाते. पण, जिरे केवळ पदार्थाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक फायदे आरोग्यास होतात. जिऱ्यामध्ये लोह, ऍटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियम सारखी पोषकतत्वे आढळतात. जिऱ्याप्रमाणेच जिऱ्याचे पाणी आरोग्याच्या विविध तक्रारी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात, जिऱ्याचे पाणी कोणत्या समस्या रामबाण उपाय आहे.
जिऱ्याचे पाणी –
- वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिम, योगाची मदत घेतली जाते. पण, धावपळीच्या रोजच्या रुटीनमध्ये प्रत्येकालाच जिम आणि योगासाठी वेळ काढणं शक्य होईलच अस नाही. अशावेळी जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्याने चरबी लवकर कमी होईल. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येईल.
- जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन व्यवस्थित होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेची तक्रार जाणवत असेल तर जिऱ्याचे पाणी प्यावे.
- जिरे पोटॅशियम, आयर्न आणि फायबरचा स्त्रोत आहे. या पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार होण्याचा धोका राहत नाही.
- डायबिटीसच्या रुग्णांसाठी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. परिणामी, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो.
- जिऱ्यामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते.
- निद्रानाशेवर जिऱ्याचे पाणी रामबाण उपाय मानला जातो. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीर आणि मन शांत होते. शरीर आणि मन शांत झाल्याने शांत झोप लागते.
- जिऱ्याचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने हृदय निरोगी राहते.
- जुलाब, अतिसाराची समस्या सुरू असल्यास जिऱ्याचे पाणी प्यावे.
- जिऱ्याचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर असते. या पाण्याच्या सेवनाने त्वचा आरोग्यदायी, चमकदार होते
जिऱ्याचे पाणी कसे तयार कराल –
- जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्यावे.
- या पाण्यात 2 चमचे जिरे मिक्स करावे आणि रात्रभर जिऱ्याचे पाणी तसेच ठेवून द्यावे.
- सकाळी हे जिऱ्याचे पाणी उकळवून घ्यावे.
- त्यानंतर तयार पाणी थोडे कोमट करुन प्यावे.
- तुम्ही या पाण्यात मधही मिक्स करू शकता.
हेही पाहा –