बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक असते. थंडीच्या दिवसात तर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तज्ञ सुद्धा हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने थंड पदार्थ खाणे टाळून शरीर आतून गरम राहील असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेष करून दही खाणे टाळावे असे आयुर्वदात सांगितले जाते कारण दह्यामुळे सर्दी- खोकला होण्याची शक्यता असते.
आयुर्वद काय सांगते ?
आयुर्वेदानुसार, थंडीच्या दिवसात दही खाणे म्हणजे अनेक आजांराना आमंत्रण देण्यासारखे आहे. हिवाळ्यात वातावरण थंड असते. अशात जर तुम्ही थंड दही खाल्लेत तर तुम्हाला सर्दी- खोकला होऊ शकतो. तुम्हाला जर आधीच खोकला असेल तर दह्याच्या सेवनाने कफची समस्या सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा तक्रारींपासून शरीराला दुर ठेवण्यासाठी दह्यापासून काही दिवस लांबच राहावे.
विज्ञान काय सांगते ?
आयुर्वेदात दह्याचे सेवन हिवाळ्यात करू नये, असे सांगितले आहे. याउलट विज्ञानानुसार, काही प्रमाणात दह्याचे सेवन केलेले योग्य मानले जाते. दह्यामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिमय मुबलक प्रमाणात आढळते. तसेच दह्यात बॅक्टेरिया असतात, जे आरोग्यासाठी फायेदेशीर असतात. दह्याच्या सेवनाने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. पण, असे असले तरी, जर तुम्हाला सर्दी असेल दह्याचे सेवन टाळावे.
एकंदरच दोन्हींचे फायदे-तोटे पाहता, तुमच्या आरोग्याच्या विचार करून तुम्ही हिवाळ्यात दह्याचे सेवन करायल हवेत.
दही खाल्याने शरीराला होणारे फायदे-
- दह्याच्या सेवनाने पचन सुरळीत होते. यासह पोट फुगणे, बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या तक्रारी कमी होतात.
- त्वचा निरोगी ठेवायची असेल तर दह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. दह्यामुळे त्वचेची चमक टिकून राहते आणि त्वचेच्या तक्रारी कमी होतात.
- दह्याच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. परिणामी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
- वजन कमी करण्यासाठी दही फायदेशीर मानले जाते. दह्यातील हाय प्रोटीन्समुळे पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही जास्तीचे खात नाही आणि वजन कंट्रोलमध्ये राहते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde