Wednesday, April 24, 2024
घरमानिनीकेसांच्या सौंदर्यासाठी कढीपत्त्याचे आहेत अगणित फायदे

केसांच्या सौंदर्यासाठी कढीपत्त्याचे आहेत अगणित फायदे

Subscribe

आयुर्वेदामध्ये कढीपत्ता अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले आहे. खरंतर, कढीपत्ता अँटीबॅक्टीरियल, अँटीफंगल आणि अँटीफ्लेमेटी या गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे यामध्ये मधुमेहापासून लढण्याची देखील शक्ती असते. सोबतच कढीपत्यांच्या पानांमुळे त्वचा आणि केस देखील चमकदार होतात.

गळणाऱ्या केसांसाठी वापरा कढीपत्ता आणि नारळाचे तेल
गळणाऱ्या केसांसाठी कढीपत्ता आणि नारळाचे तेल खूप फायदेशीर आहे. यासाठी नारळ तेल गॅसवर गरम करा आणि त्यात कढीपत्त्याची पानं टाका. पानांचा रंग लालसर झाल्यानंतर गॅस बंद करा. आता तेल एका बाटली मध्ये गाळून घ्या. आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावा. या उपायाने तुमचे केस नेहमी काळे राहतील आणि मजबूत देखील होतील.

- Advertisement -

केसांसाठी तयार करा कढीपत्त्याचा मास्क

- Advertisement -

काळ्या केसांसाठी कढीपत्ता खूप फायदेशीर आहे. त्यासाठी कढीपत्त्याला राईच्या तेलात शिजवा. आणि त्यानंतर हे तुमच्या केसांमध्ये लावा. वारंवार हे मिश्रण केसांना लावल्यास याचा नक्कीच चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल.

कढीपत्ता आणि दही
तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुम्ही कढीपत्त्यांच्या पानांना बारीक वाटून घ्या आणि त्यात दही मिक्स करा. यामुळे नक्कीच केसातील कोंडा कमी होईल.

लांबसडक केसांसाठी वापरा कढीपत्ता आणि कांद्याचा रस
लांबसडक केसांसाठी तुम्ही कढीपत्त्याचा रस काढून घ्या आणि त्यात कांद्याचा रस मिक्स करा. आता या मिश्रणाला तुमच्या केसांमध्ये लावा. यामुळे तुमचे केस लांब होण्यास मदत होईल.


हेही वाचा :

घरच्या घरी बनवा केमिकल – फ्री ‘सनस्क्रीन’

- Advertisment -

Manini