Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenCutlet Recipe : मुलांच्या टिफीनमध्ये द्या नाचणी-बटाटा कटलेट

Cutlet Recipe : मुलांच्या टिफीनमध्ये द्या नाचणी-बटाटा कटलेट

Subscribe

नाचणी-बटाटा कटलेट रेसिपी

नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर नाचणी खूपच उपयोगी आहे.  त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणी-बटाटा कटलेट कसे करतात हे सांगणार आहोत.

साहित्य : 

  • 1 वाटी मोड आलेली नाचणी
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 मोठा चमचा बेसन
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1 चमचा जिरे पावडर
  • 1 चमचा गरम मसाला पावडर
  • पाव चमचा साखर
  • 1 वाटी कोंथिबीर
  • 1  पातीचा कांदा
  • 1 वाटी पोहे
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती : 

Ragi Cutlet Recipe - NDTV Food

- Advertisement -
  • सर्वप्रथम मोड आलेली नाचणी मिक्सरला थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी.
  • त्यानंतर एका पातेल्यात घेऊन, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत.
  • नंतर सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. पोहे मिक्सरला सरसरीत वाटून घ्यावे.
  • या मिश्रणात घालून एकत्र करावे. त्यामुळे मिश्रणाला घट्टपणा येईल.
  • फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घालून छोटे छोटे कटलेट शॅलो फ्राय करावेत.
  • हे पौष्टिक कटलेट खूप चविष्ट आणि कुरकुरीत लागतात.
  • हे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini