घरक्राइमसायबरच्या जगात फसवणूकदारांपासून दूर राहण्यासाठी 'या' टिप्स येतील कामी

सायबरच्या जगात फसवणूकदारांपासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी

Subscribe

चंदा मांडवकर : 

 

- Advertisement -

सध्याच्या दिवसात सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. मात्र गेल्या काही काळापासून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्याची प्रकरणे ही दिवसागणिक वाढत चालली आहे. सरकारकडून ही अशा ऑनलाईन फसवणूकींना आळा घालण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली जातातच. पण नागरिकांना ही ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी याबद्दल ही सुचना दिल्या जातात. तरीही नागरिकांची फसवणूक होतेच. अशातच तुम्ही सुद्धा दररोज ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. त्याचसोबत आपल्याला आपल्या सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती असली पाहिजे. जेणेकरुन ऑनलाईन फसवणूकदारांना अगदी सहज कोणतीही अतिसंवेदनशील माहिती त्यांच्या हाती लागणे कठीण होईल.

सायबर सुरक्षेसंबंधित जागृता निर्माण करण्यासाठीच्या महिन्याची सुरुवात २००४ मध्ये संयुक्त राज्य अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी सुरु केली होती. प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर मध्ये डिजिटल सुरक्षा आणि व्यक्तीगत माहितीसंदर्भातील सुरक्षितेतेबद्दल जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु केला होता. पण आता सायबर सिक्युरिटी ही काळाची गरज बनली आहे. व्यक्तीगतच नव्हे तर बड्या कंपन्या ही सायबर सिक्युरिटीचा वापर करुन आपला डेटा जेवढा अधिक सुरक्षित राहिल याचा नेहमीच प्रयत्न करत असतात.

- Advertisement -

सायबर सिक्युरिटी म्हणजे नक्की काय? सायबर सिक्युरिटी ही एक प्रकारची इंटरनेटची सिक्युरिटी असते. जे तुमच्या मॅलवेअर, ब्लॅक हॅट हॅकर्स किंवा अन्य प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून दूर ठेवते. सायबर सुरक्षिततेत कंप्युटर आमि नेटवर्कवर उपलब्ध असलेली कोणत्याही प्रकारच्या सुचना आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासंदर्भात अभ्यास केला जातो.

जेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करता किंवा इंटरनेटशी कनेक्ट झालेले असता तेव्हा काही प्रकारचा धोका तुमच्यावर असतो. कारण हॅकर्स विविध पद्धतीने सायबर सुरक्षिततेचे उल्लंघन करत तुमच्या सिस्टिम पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्या खासगी डेटाचा ही चुकीच्या मार्गाने वापर करु शकतात. त्यामुळेच सायबर सिक्युरिटीचा वापर केला जातो.

सायबर सिक्युरिटी का महत्वाची ?

What Cybersecurity Threats Should You Watch Out for in 2022? - California Business Journal

टेक्नॉलॉजीच्या काळात आपण सर्वजण इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. कधीकधी आपण नकळतपणे आपला खासगी डेटा ही इंटरनेटच्या माध्यमातून शेअर करतो. अशातच तुमचा तो डेटा धोक्यात येण्याची फार शक्यता असते. सरकार, कॉर्पोरेट कंपन्या, आर्थिक कंपन्या आणि मेडिकल सायन्स असे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचा खुप वापर करतात. यांचा डेटा ही अधिक संवेदनशील असतो. त्यामुळेच त्यांना आपली सायबर सुरक्षा तज्ञांच्या माध्यमातून त्याची काळजी घ्यावी लागते.

सायबर सिक्युरिटीच्या मदतीने इंटरनेट आणि सिस्टिमवर उपलब्ध असलेला सर्व डेटा सुरक्षित ठेवला जाऊ शकतो. त्याचसोबत तो चोरी होण्याचा धोका ही कमी होतो. दिवसागणिक जसा डेटा अधिक वाढत जातो त्यानुसार त्याची काळजी घेण्यासंदर्भातील समस्या ही वाढतात. त्यामुळेच डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रोडक्ट्स आणि सर्विसेजची गरज भासते.

सायबर सिक्युरिटीसंदर्भातील काही टीप्स

cyber fraud, Cyber Security Tips: मिनिटात होऊ शकते तुमचे बँक खाते रिकामे, सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स - how to protect your devices from cyber attacks know ...

  • जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्या फोनमधील सायबर सिक्युरिटीची काळजी घ्या. फोनमध्ये अॅन्टीवायरस जरुर इंस्टॉल करा.
  • एक उत्तम ॲन्टीवायरस तुम्हाला मॅलवेयर आणि डेटा सिक्युरिटी ब्रीचच्या धोक्यापासून दूर ठेवण्याचे काम करतो
  • नेहमीच या गोष्टीची काळजी घ्या की, बँक तुम्हाला कधीच एटीएम कार्ड क्रमांक, सीवीवी, ओटीपी, युपीआय पिनची विचारणा करत नाही.
  • सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टिम वेळोवेळी अपडेट करा.
  • नेहमीच मजबूत पासवर्डचा वापर करा. तो असा ठेवावा की, कोणताही व्यक्ती अगदी सहज क्रॅक करु शकणार नाही.
  • आपला पासवर्ड कोणासोबत ही शेअर करु नका.
  • एखादी अज्ञात ईमेलवरुन आलेली फाइल कधीच उघडून पाहू नका.
  • कारण त्यामध्ये वायरस असू शकतो. याच्या माध्यमातून सायबर हल्लेखोर तुमचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करु शकतात.
  • अज्ञात मेसेजमधील लिंकवर ही कधीच क्लिक करु नका
  • सार्वजनिक किंवा अज्ञात वायफाय नेटवर्कचा वापर करण्यापासून दूर रहा.
  • गृहमंत्रालयाद्वारे ऑनलाईन सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल सुरु करण्यात आले आहे तेथे तुम्ही तक्रार करु शकता.
  • या व्यतिरिक्त १९३० क्रमांकावर संपर्क साधत तुम्ही सायबर गुन्ह्यांविरोधात मदत घेऊ शकता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -