Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyथंडीत वाढते कोंड्याची समस्या , वापरा 'या' टीप्स

थंडीत वाढते कोंड्याची समस्या , वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

कोंड्याची समस्या अशी आहे की, जी लपवता येत नाही. कोंड हा फंगसच्या कारणास्तव होतो. जो ह्युमिड वातावरणात अधिक वाढू लागतो. केसात कोड्यांची समस्या झाल्यास पांढऱ्या रंगाचे फ्लेक्स दिसून येऊ लागतात. हे फ्लेक्स हात लावल्यानंतर खाली पडतात आणि खांद्यावर पसरले जातात. कोंड्याची समस्या थंडीत अधिक वाढली जाते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणते घरगुती उपाय तुम्ही करू शकता हे पाहूयात.

कोंड्याच्या समस्येपासून असे रहा दूर
-एका वाटीत नारळाचे तेल घेऊन त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता हे तेल केसांना लावा आणि थोड्यावेळाने धुवा. लिंबातील सिट्रिक अॅसिड कोंड्याची समस्या कमी करतो. त्याचसोबत एंन्टीमाइक्रोबिल गुण हे फंगस दूर करतात.

- Advertisement -

या व्यतिरिक्त तुम्ही कडुलिंबाच्या पानांमध्ये अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. जे केसांमधील कोंडा मूळापासून दूर करते. यामुळे स्कॅल्प डिटॉक्सिफाय होतात आणि एक्सेस ऑइल ही कमी होते. कडुलिंबाची पाने वाटून त्याचा रस काढला जाऊ शकतो. हा रस केसांना लावा आणि 10 मिनिटांनी केस धुवा. यामुळे कोंडा कमी होईल.

तसेच कोंडा कमी करण्यासाठी बेकिंग सोडासुद्धा कामी येईल. बेकिंग सोडा पाण्यासह मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. स्कॅल्पवर पेस्ट लावा आणि नंतर पहा. आठवड्यातून दोन वेळेस बेकिंग सोडा लावल्याने कोंडा निघून जाईल.

- Advertisement -

जर कोंडा कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर दही बेस्ट पर्याय आहे. दही केसांना लावल्यास कोंड्याची समस्या दूर होईल. संपूर्ण केसांनाही तुम्ही दही लावून ठेवू शकता.


हेही वाचा- लांबसडक केसांसाठी असा हवा हेअर मसाज

- Advertisment -

Manini