सध्या सोलो ट्रिपचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे अनेक महिलाही सोलो ट्रिपला जाण्याचा बेत आखतात. पण, सोलो ट्रिपला जाण्याआधी आपण जात असलेलो ठिकाण महिलांसाठी किती सुरक्षित आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, जगातील अशा देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जे महिला ट्रॅव्हलर्ससाठी असुरक्षित आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा देशांची नावे सांगणार आहोत, जेथे महिलांना एकटे फिरणे असुरक्षित वाटते.
दक्षिण आफ्रिका –
महिलांना प्रवास करण्यासाठी असुरक्षित देशांमध्ये आफ्रिका खंडातील सर्वात प्रगत देशांपैकी प्रमुख असलेला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात पहिला क्रमांक येतो. येथील केवळ 25% महिलानांच बिनधास्तपणे रात्री ट्रॅव्हल करणे सुरक्षित वाटते. ही आकडेवारी जागतिक पातळीवर सर्वात कमी मानली जाते.
ब्राझील –
एका रिपार्टनूसार, ब्राझीलमधील फक्त 28% महिलांना रात्री फिरणे सुरक्षित वाटते. याव्यतिरीक्त महिलांची जाणूनबुजून हत्या करण्यात येणाऱ्या देशांमध्ये जगात ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रशिया –
हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असला तरी, महिला ट्रॅव्हलर्ससाठी असुरक्षित मानला जातो. या यादीत रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मेक्सिको –
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांमध्ये मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या हत्या होतात.
इराण –
इराण हा जगातील पाचवा देश आहे, जिथे महिलांना सर्वात जास्त असुरक्षित वाटते.
डोमेनिक प्रजासत्ताक –
डोमेनिक प्रजासत्ताक देशातील केवळ 33 % महिलांना रात्री एकट्याने प्रवास करणे सुरक्षित वाटते.
इजिप्त –
इजिप्त हा देश महिला प्रवाशांसाठी धोकादायक असणाऱ्या देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
मोरोक्को –
रिपार्टनुसार, मोरोक्कोच्या जवळपास निम्म्या महिलांना शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराचा जोडीदाराकडून अनुभव आला आहे.
भारत –
महिला ट्रॅव्हलर्ससाठी असुरक्षित देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. देशातील 37.2% महिलांना एकट्याने प्रवास करणे असुरक्षित वाटते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde