Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship पालकांनो मुलांना 'या' ऑनलाईन गेम पासून ठेवा लांब

पालकांनो मुलांना ‘या’ ऑनलाईन गेम पासून ठेवा लांब

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेम्स एंटरटेनमेंटचे मोठे माध्यम बनून समोर आले आहे. स्मार्टफोन आणि कंप्युटर सिस्टिमच कमी किंमतीत उपलब्ध असल्याने मुलं ते पालकांकडे घेण्याचा हट्ट करतात. भले हे गेम्स मुलांचे मनोरंजन करतात. पण काही प्रकरणी पालकांनी या प्रति जागृक राहिले पाहिजे. काही असे गेम्स आहेत जे मुलांवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात.(Dangerous games for child)

माइनक्राफ्ट

- Advertisement -


हा गेम मुलांमध्ये फार पॉप्युलर आहे. या गेममध्ये इन-अॅप परचेस आणि अज्ञात व्यक्तींसोबत खेळण्याची मुलांना संधी मिळते.

धोका का आहे?
इन-अॅर परजेचसाठी मुल आपल्या आई-वडिलांच्या नकळत कार्डचा वापर करु शकतात. अशातच मुलांची फसवणूक होण्याची शक्यता असते. तर अज्ञात लोकांच्या संपर्कात राहिल्याने खासगी आयुष्य ही धोक्यात येऊ शकते.

- Advertisement -

मरियम गेम


हा गेम अशा कॅरेक्टरच्या आसपास फिरतो जो रस्ता चुकला आहे. प्लेयर्सला त्याला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करायचे असते.

धोका का आहे?
या गेम मधील विज्युवल्स आणि साउंड्स भीतीदायक आहेत. जे मुलांमध्ये भीती निर्माण करु शकतात. यामध्ये प्लेयरची खासगी माहिती विचारली जाते. अशातच सुरक्षिततेसंबंधित धोका वाढतो.

फोर्टनाइट


हे सर्वाधिक पॉप्युलर ऑनलाईन गेम्सपैकी एक आहे. या सर्वाइवल अॅक्शन गेममध्ये प्रत्येक स्टेजवर खुप हिंसाचार दाखवण्यात आला आहे. जो मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम पाडू शकतो. (Dangerous games for child)

मॉर्टल कॉम्बेट


या गेमची रेटिंग 18 प्लस आहे. यावरुन तुम्हाला कळेल की, या गेममध्ये किती हिंसाचार दाखवला गेला असेल.

डेड ट्रिगर

 
हा संपूर्ण गेम झॉम्बींना मारण्याच्या थीमवर फोकस आहे. यामध्ये अधिक रक्तपात आणि हिंसाचार दिसून येतो.


हेही वाचा- मुलांना Mentally Strong बनवायचे असेल तर पालकांनी ‘या’ चुका करु नये

- Advertisment -

Manini