Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health जगातील विषारी मशरुम...

जगातील विषारी मशरुम…

Subscribe

जुलै महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियातील लहान शहर विक्टोरिया मधील एकाच परिवारातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर सध्या एका खास मशरुमची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खरंतर त्यांचा मृतय्यू डेथ कॅप मशरुममुळे झाला आहे. ही एक मशरुमची प्रजाती आहे, जी अत्यंत विषारी असते. अशी बातमी समोर येत आहे की, दुपारच्या जेवणात वाढल्या गेलेल्या बीफमध्ये या घातक मशरुमचा वापर करण्यात आला होता. अशातच भारतात सुद्धा हे मशरुम येतात का? याच संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. (Death cap mushroom)

नेचर कम्युनिकेशन जर्नलच्यानुसार, डेथ कॅप मशरुम म्हणजेच अमनिटा फालोइड्स विषारी एक्टोमाइकोरिजल बेसिडिओमाइसीट आहे. हे मूळ रुपात युरोपीयन मशरुम आहे. ते उत्तर अमेरिकेतून खासकरुन कॅलिफोर्नियासह ऑस्ट्रेलिया राज्यात पोहचले. या मशरुमचा अर्धा हिस्सा विषारी असतो. तो हिस्सा व्यक्तीचा जीव सुद्धा घेऊ शकतो. शिजवल्यानंतर सुद्धा जीव जाऊ शकतो.

- Advertisement -

डेथ कॅप मशरुममध्ये तीन प्रकारचे पॉइजनिंग पदार्थ असतात. जसे की, अमेटॉक्सिन, फॅलोटॉक्सिन आणि वायरोटॉक्सिन. यापैकी सर्वाधिक विषारी एमाटॉक्सिन आहे. हे कोशिकांमध्ये प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया रोखली जाते. त्यामुळे डेथ मशरुम जरी शिजवले तरीही त्यामधील विष नष्ट होत नाही.

- Advertisement -

भारतात सर्वसामान्यपणे सफेद बटण मशरुम-एगरिकस बिस्पोरस खाल्ले जातात. 2020 मध्ये मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यात एका दूरदराज गावात डेथ कॅप मशरुम खाल्ल्याने सहा लोकांचा जीव गेला होता. संपूर्ण जगात मशरुम संबंधित 90 टक्के मृत्यूसाठी डेथ कॅप म्हणजे अमनिटा फालोइड्स जबाबदार असतात.


हेही वाचा- ब्लोटिंगच्या समस्येवर किचनमधील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय

- Advertisment -

Manini