ख्रिसमस हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. हा सण आपण आपल्या कुटुंब किंवा मित्रपरिवारासह साजरा करतो. हा सण एकत्र साजरा केल्याने या आनंद आणि उत्साह द्विगुणित होतो. या खास दिवशी घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होत. या दिवसाला अजून स्पेशल बनवण्यासाठी आपण घर देखील सजवतो. ख्रिसमस ट्री, लाइटिंग, लहान दिवे लावतो. परंतु यावर्षी तुम्हाला काही हटके आणि आकर्षक करायचं असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
बऱ्याचदा आपण ख्रिसमसला तेचतेच डेकोरेशन करतो. त्यामुळे यामध्ये काही नावीन्य राहत नाही. त्यामुळे तुम्ही यावर्षी वेगळ्या पद्धतीने तुमचं घर सजवू शकता. आज आपण जाणून घेऊयात, ख्रिसमसला कोणत्या पद्धतीने घर सजवू शकतो.
स्नोमॅन
तुम्ही घरी देखील हा स्नोमॅन बनवू शकता. स्नोमॅनमुळे हा सण अजून स्पेशल होईल. कापसाच्या साहाय्याने स्नोमॅन बनवू शकता.
मुख्य दरवाजा
मुख्य दरवाजा तुम्ही वॉल हँगिंग, पाइन, फुलं, ख्रिसमस बेल किंवा काही आकर्षक वॉल हँगिंग तयार करून त्याप्रमाणे सजवू शकता. घराचा मुख्य प्रवेश आकर्षक असणे अत्यंत गरजेचं आहे. घरचा मुख्य प्रवेश सुंदर आणि आकर्षक असेल तर घराची शोभा अजूनच वाढते.
ख्रिसमस ट्री
तुम्ही तुमच्या घराच्या डेकोरेशन प्रमाणे लहान किंवा मोठे ख्रिसमस ट्री आणू शकताआणि सजवू शकता. या झाडाला तुम्ही सुंदर लाइटिंग्स चॉकलेट गिफ्ट याने सजवू शकता या ख्रिसमस ट्री ची शोभा वाढवू शकता.
लाइटिंग डेकोरेशन
खिडक्या, बाल्कनी, आणि भिंतींवर फेयरी लाइट्स लावू शकता टेबल आणि शेल्फ्सवर फुलं ठेवू शकता.
डायनिंग टेबल सजावट
डायनिंग टेबलवर तुम्ही लाल, सोनेरी, किंवा पांढऱ्या रंगाचा टेबल रनर वापरू शकता.
वॉल डेकोरेशन
तुम्ही वॉलसाठी लाइटिंग्स किंवा ख्रिसमसच्या थीमनुसार देखील डेकोरेशन करू शकता.
गिफ्ट
ख्रिसमस ट्री जवळ तुम्ही सुंदर असे गिफ्टचे बॉक्स ठेवू शकता. हे गिफ्ट बॉक्स तुम्ही पेपरच्या किंवा पुठ्याच्या साहाय्याने घरी देखील बनवू शकता.
अशाप्रकारे तुम्ही ख्रिसमसला यावर्षी आकर्षक आणि सुंदररित्या घर सजवू शकता. आणि घराची शोभा वाढवू शकता.
हेही वाचा : Friend Hoarding : मित्रमैत्रिणींमध्ये वाढतोय फ्रेंड होर्डिंगचा ट्रेंड
Edited By : Prachi Manjrekar