Tuesday, May 21, 2024
घरमानिनीदीपिका फॉलो करतेय हा प्रेग्नेंट डाएट प्लॅन

दीपिका फॉलो करतेय हा प्रेग्नेंट डाएट प्लॅन

Subscribe

दीपिका पदुकोण सध्या तिच्या गुड न्यूजमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना ते आई बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली. दीपिका पदुकोण प्रेग्नेंट असून तिचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तिचा फॅन फॉलोविंग वर्ग उत्सुक आहेत. स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी प्रेगन्सीदरम्यान दीपिका काही खास डाएट प्लॅन फॉलो करत आहे.

दीपिका पाळते हे नियम – मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका सध्या फारसे काही काम करत नाही. ती पूर्णपणे प्रेगन्सीचा आनंद घेताना दिसत आहे. आई- वडिलांच्या घराशिवाय ती सध्या कुठेही जात नाही. आई आणि सासूने दिलेल्या टिप्स ती काटेकोरपणे पाळत आहे. रणवीरदेखील दीपिकाची प्रेगन्सीदरम्यान खूप काळजी घेत आहे. तिला हवे नको ते बघत आहे. दीपिकाला दिलेल्या सर्व कमेंट्स रणवीर पूर्ण करत आहे. बाळाच्या जन्मांपर्यंत दीपिका या नियमांचे पालन करणार आहे.

- Advertisement -

दीपिकाचा डाएट प्लॅन – दीपिकाने प्रेगन्सीची गुड न्युज दिल्यापासून तिचे चाहते तिचा डाएट प्लॅन आणि फिटनेसबद्दल ऐकण्यास उत्सुक आहेत. दीपिका नाश्त्यामध्ये इडली, डोसा, उपमा, 2 अंडी, 2 बदाम आणि 1 कप दूध पिते. तर दुपारच्या जेवणात दीपिका प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर देत आहे. याशिवाय डाळ, नारळपाणी, पोळी आणि भाज्या सुद्धा नियमितपणे खात आहे. संध्याकाळी ती फ्लिटर कॉफी पिते. रात्रीच्या जेवणात दीपिका पालेभाज्या आणि कोशिंबीर खाते.

- Advertisement -

दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक कामांमुळे चर्चेत असते. दीपिका शेवटची फायटर या चित्रपटात दिसली होती. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. दीपिकाचा ‘कल्की 2898 एडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आहे. असे असले तरी आता दीपिका प्रेग्नेंट असल्याने दीपिका प्रेगन्सीसाठी ब्रेक घेणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. आता सर्वत्र दीपिका आणि रणवीरच्या बाळाची चर्चा असून त्यांचे चाहते बाळाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

 

 

 

 

 


हेही पहा : करीना म्हणते तैमूर दादागिरी करतो पण

 

- Advertisment -

Manini