Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthDehydration चा पिरियडवर होतो परिणाम

Dehydration चा पिरियडवर होतो परिणाम

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी आणि शरिराने सुरळीत कार्य करण्यासाठी हाइड्रेड राहणे फार गरजेचे असते. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास काही नुकसान ही होते. खासकरुन, उन्हाळ्यात डिहाइड्रेशनमुळे काही समस्या ही उद्भवतात. डिहाइड्रेशनच्या कारणास्तव चक्कर येणे, डोके दुखी, पाचनाची समस्या किंवा स्किन ड्राय सुद्धा होते. अशातच पीरियड्स दरम्यान होणाऱ्या डोके दुखीमागील कारणाचा थेट संबंध हाइड्रेशनशी असल्याचे सांगितले तर यावर विश्वास ठेवाल का?

खरंतर महिलांनी पीरियड्स दरम्यान हाइड्रेट राहणे फार गरजेचे असते. जर पीरियड्स मध्ये महिला पुरेशा प्रमाणात पाणी पित नसतील तर यामुळे ब्लड फ्लो आणि पीरियड्स पेनवर परिणाम होतो. केवळ हेच नाही तर पीरियड्सच्या दिवसात शरिरात पाण्याच्या कमतरतेमुळे काही समस्या उद्भवतात. याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.

- Advertisement -

पीरियड्स दरम्यान पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास काय होते?
-पीरियड्सच्या दिवसात जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायलात तर याचा थेट परिणाम तुमच्या पीरियड्स क्रॅम्पवर पडतो. क्रॅम्प्स येण्यामागील एक मोठं कारणं म्हणजे पाणी योग्य पद्धतीने न पिणे. डिहाइड्रेशनच्या कारणास्तव पीरियड पेन वाढू शकते.
-जर तुम्ही या दिवसात कमी पाणी पित असाल तर यामुळए शरिरातील वात वाढू शकतो. अशातच पीरियड्स पेन वाढू शकते. यामुळेच क्रॅम्प्स पासून दूर राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
-जेव्हा कमी पाणी पितात तेव्हा यामुळे महिलांच्या गर्भाशयाच्या ब्लड फ्लो मध्ये कमतरता निर्माण होते. यामुळे क्रॅम्प्स वाढतात.
-पीरियड्स दरम्यान कमी पाणी प्यायल्यानंतर ब्लोटिंग, माइग्रेन, डोकेदुखी, थकवा जाणवणे, स्नायू दुखणे अशा समस्या होऊ शकतात.
-पीरियड्स पेन पासून दूर राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. जर तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर जवळजवळ ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.

- Advertisement -

काय करावे?
-पीरियड्स दरम्यान पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
-यावेळी कोमट पाणी प्यावे, जेणेकरुन आराम मिळेल.
-तुमच्या शरिराला किती प्रमाणात पाण्याची गरज आहे हे तुमच्या शारिरीक, फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि ऋतूवर निर्भर असते.
-तज्ञांच्या मते तुमची युरिन क्रिस्टल क्लिअर असावी.
-युरिन पिवळी आणि स्मेली असणे सुद्धा पाण्याच्या कमतरेचे लक्षण आहे.


हेही वाचा- Periods च्या डागांना ‘या’ प्रोडक्ट्सने करा गुड बाय

- Advertisment -

Manini