उन्हाळयातच नाही तर हिवाळ्यात देखील आपलं शरीर डीहायड्रेट होते. हिवाळ्यात थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे आपण पाणी खूप कमी पितो. आपल्याला शरीराला पुरेसे पाणी मिळाल नाही तर शरीर डीहायड्रेट होते. बरेच लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात डीहायड्रेशन होण्याची लक्षणे
डिहाइड्रेशनची ही आहेत लक्षणे
- कमी तहान लागणे – हिवाळ्यात आपल्याला बऱ्याचदा कमी तहान लागते.
- थकवा जाणवणे – शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने थकवा जाणवतो.
- डोकेदुखी- डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते
- चक्कर येणे – शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येते.
- त्वचा कोरडी पडणे – हिवाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते.
- बद्धकोष्ठता – पाण्याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
हिवाळ्यात डीहायड्रेशन कसे टाळावे?
हायड्रेट राहा
हिवाळ्याच्या दिवसात शरीर डीहायड्रेट होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे.
गरम पेय
गरम चहा, कॉफी, सूप इत्यादी प्यायल्याने तुमचे शरीर गरम तर राहतेच शिवाय हायड्रेटही राहते. यामध्ये कमीतकमी साखरचा वापर करा.
फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही काकडी, कलिंगड , संत्री, गाजर इत्यादी खा.
मिठाचे सेवन कमी करा
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे मीठ कमी प्रमाणात खावे. यामुळे बीपीही नियंत्रणात राहील.
डीहायड्रेशनचा गंभीर परिणाम
डीहायड्रेशनचा गंभीर परिणाम आपल्याला शरीरावर होतो.यामुळे किडनीचे आजार, हृदयविकार आणि मृत्यू यासारख्या अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.
हेही वाचा : थंडीत लहान मुलांसह पिकनिकचा प्लॅन? घ्या ही काळजी
Edited By : Prachi Manjrekar