अनेकांना वेगवेगळ्या मिठाई खायला आवडतात. सण-समारंभावेळी बाजारातील काही मिठाई भेसळयुक्त असतात. अशावेळी तुम्ही घरीच बेसन बर्फी बनवू शकता.
साहित्य :
- 1 कप बेसन
- 1/2 कप तूप किंवा डालडा
- 1/2 कप साखर
- 2-3 चमचे रवा
कृती :
- सर्वप्रथम रवा आणि बेसन चांगले भाजून घ्या. त्यांचा रंग छान लालसर येईपर्यंत परतून घ्या.
- त्यानंतर त्यात तूप घालून बेसन परता.
- आता दुसऱ्या एका भांड्यात अर्धा कप साखर आणि त्याच्या अर्धे पाणी घालून पाक तयार करा.
- पाक चांगला तयार झाल्यानंतर त्या सारणात पाक ओतून एकजवी करा.
- हे गरमगरम सारण तूप लावलेल्या ताटात चांगले थापून घ्या आणि नंतर आपल्याला हव्या असलेल्या आकारात त्याचे काप काढा.
- अशाप्रकारे झटपट घरच्या घरी बनवा बेसन बर्फी.