घरलाईफस्टाईलस्वीट डिश: पेरूचा हलवा

स्वीट डिश: पेरूचा हलवा

Subscribe

पेरूचा हलवा रेसिपी

आतापर्यंत आपण गाजर हलवा, बीट हलवा आणि दुधी हलवा बनवल्याचे आपण पाहिले आहे. पण, आज आपण फळाचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत. पेरूचा हलवा कसा बनवायचा पाहूया.

साहित्य

- Advertisement -
  • अर्धा किलो साल आणि बिया काढलेले पेरु
  • २ चमचे तूप/बटर
  • कंडेन्स्ड दूध
  • ३० ग्रॅम खवा
  • ड्राय फ्रुट्स

कृती

सर्वप्रथम पेरुची सर्व साल, बिया काढून पेरू मिक्सरमध्ये फिरवून किंवा ब्लेंडरने बारीक करून त्याची प्युरी करून घ्या. ही प्युरी आहे त्या प्रमाणापेक्षा पाव प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. वरून तूप किंवा बटर घालून २-३ मिनिटे आणखी शिजवा. त्यात कंडेन्स्ड दूध आणि खवा मिसळा. नंतर ब्राऊन होईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवा. वरून तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स घालून पेरुचा हलवा सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -