Friday, February 23, 2024
घरमानिनीDental Care: मुलांना cavity पासून कसे दूर ठेवाल?

Dental Care: मुलांना cavity पासून कसे दूर ठेवाल?

Subscribe

लहान मुलांना चॉकलेट, आइस्क्रिम, बिस्किट पासून दूर ठेवणे फार मुश्लिक असते. त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवावे लागते आणि हेच काम फार मुश्किल असते. अशातच मुलं दिवसभर काही ना काहीतरी खात असतात. त्यामुळे मुलांना कॅव्हिटीची समस्या होऊ शकते. पण मुलांना जर कॅव्हिटीपासून दूर ठेवायचे असेल तर नक्की काय करावे याच बद्दल आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

-ब्रश करण्याची सवय

- Advertisement -


मुलांना कॅव्हिटीपासून दूर ठेवण्यासाठी सर्वाधिक मोठी सवय म्हणजे मुलांना ब्रश करण्याची सवय लावावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी जवळजवळ दोन मिनिटे तरी ब्रश करण्याची सवय तुम्ही तुमच्या मुलाला लावा.

-फूड शेअर करु नका

- Advertisement -


काही वेळेस असे होते की, मुलांना तुमच्या प्लेट मधीलच खायचे असते किंवा त्यांना त्यामधील भरवावे लागते. अशातच शक्यता असते की, त्यांच्या दातांमध्ये बॅक्टेरिया जाऊ शकतो. अशातच तुम्ही उष्ट्या चमच्याने मुलांना कधीच भरवू नये.

-अधिक गोड खाण्यापासून दूर ठेवा


मुलांना अधिक गोड पदार्थ खाण्यापासून दूर ठेवा. त्यांना चॉकलेट्स खुप आवडतात. पण याच गोष्टी त्यांच्या कॅव्हिटीसाठी कारणीभूत ठरु शकतात. अधिक ज्यूसचे सेवन करणे सुद्धा दातांच्या आरोग्याला धोका पोहचवू शकते.

-फास्ट फूड पासून दूर ठेवा


अधिक फास्ट फूड आणि बटाट्यापासून तयार करण्यात आलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका. मुलांना पिझ्जा, बर्गर किंवा चिप्स ही अधिक देऊ नका.

-रेग्युलर चेकअप


ज्या प्रमाणे तुम्ही मुलाच्या आरोग्यासाठी फॅमिली डॉक्टरला भेटता. त्याचप्रमाणे त्यांच्या दातांसाठी प्रत्येक सहा महिन्यांनी डेस्टिंटला सुद्धा भेटा. त्यांच्या दातांचे रेग्युलर चेकअप करु शकता.


हेही वाचा- वयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांनी बेडरूम शेअर करू नये

- Advertisment -

Manini