Saturday, March 22, 2025
HomeमानिनीFashion Tips : होळीला सफेद कुर्ती असे डिझाइन करा

Fashion Tips : होळीला सफेद कुर्ती असे डिझाइन करा

Subscribe

लवकरच होळी येणार असून ऑफिस किंवा मित्राच्या घरी खास होळी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत सर्वजण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात. परंतु जर तुम्हाला काही हटके आणि युनिक ट्राय करायचं असेल तर तुम्ही हवे असेल तर तुम्ही काहीतरी वेगळे आणि नवीन ट्राय करू शकता. तुम्ही तुमच्या पांढऱ्या कुर्त्याला स्टायलिश लूक देऊ शकता.

हाताच्या प्रिंटची बनवा डिजाइन

जर तुम्हाला वाटत असेल तुमची कुर्ती निस्तेज दिसत असेल तर तुम्हाला फक्त पाण्यात थोडा रंग मिसळावा लागेल.. यानंतर, तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुर्तीवर हाताने छापलेले डिझाइन तयार करावे लागेल. या प्रकारच्या डिझाइनमुळे तुमची कुर्ती बहुरंगी दिसेल. तसेच, तुम्हाला बाहेर जाऊन वेगळी कुर्ती खरेदी करावी लागणार नाही. तुम्हाला एक वेगळा लूक मिळेल.

पांढऱ्या कुर्तीला मल्टी कलरमध्ये डिझाइन करा

जर तुम्ही पांढरा कुर्ता खरेदी केला असेल तर तुम्ही त्या पांढऱ्या कुर्त्याला मल्टी कलरमध्ये डिझाइन करू शकता. यासाठी तुम्हाला रंगासाठी थोडे पैसे द्यावे लागतील. तुम्हाला एक नवीन आणि सुंदर लूक मिळेल.

हैप्पी होली कुर्ती

जर तुम्हाला काही हटके आणि आकर्षक लूक करायचं असेल तर तुम्ही हैप्पी होली कुर्ती डिजाइन क्रिएट करू शकता. या प्रकारची कुर्ती घातल्यानंतर तुम्ही चांगले दिसाल तुम्ही ब्रशच्या मदतीने स्प्रे पेंटिंगसारखे डिझाइन तयार करू शकता. कुर्तीच्या मध्यभागी हॅपी होळी असे लिहू शकता यानंतर ते सुकू द्या. हे तुम्ही होळीला घालू शकता.

हेही वाचा : Holi 2025 : होळीला रंग खेळण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली?


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini