Diabetes Control : डायबिटीजमुळे गोड पदार्थ खाणं टाळताय का ? मग, ‘हे’ पदार्थ ट्राय कराच

मधुमेहामध्ये गोड खाण्यासाठी मनाई केली असताना या रुग्णांना आपली मनातली इच्छा मारावी लागते. कारण हे गोड पदार्थ खाणे या मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक ठरु शकते. रक्तातील साखर वाढू नये म्हणून अनेकदा गोड पदार्थ समोर असूनदेखील खाता येऊ शकत नाही, अशी गत अनेकदा मधुमेहासारखी व्याधी असणाऱ्या खवय्यांची होते.

Diabetes Control: Does diabetes prevent you from eating sweets? Then, try this substance
Diabetes Control : डायबिटीजमुळे गोड पदार्थ खाणं टाळताय का ? मग, 'हे' पदार्थ ट्राय कराच

प्रत्येकाच्या जीभेवर रेंगाळणारी चव वेगळी असते, म्हणजे प्रत्येकालाच वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्यासाठी खवय्ये हे नेहमीच उत्सुक असतात. त्यातच काहीजण मधुमेह रुग्ण असतात. मात्र या मधुमेहामध्ये गोड खाण्यासाठी मनाई केली असताना या रुग्णांना आपली मनातली गोड खाण्याची इच्छा मारावी लागते. कारण हे गोड पदार्थ खाणे या मधुमेह रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक ठरु शकते. रक्तातील साखर वाढू नये म्हणून अनेकदा गोड पदार्थ समोर असूनदेखील खाता येऊ शकत नाही, अशी गत अनेकदा मधुमेहासारखी व्याधी असणाऱ्या खवय्यांची होते. मात्र ही गोड खाण्याची इच्छा आता तुम्ही खालील पदार्थ खाऊन पूर्ण करु शकता.

ड्रायफ्रुट्सचे लाडू

मधुमेहाचे रुग्ण आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुमेहाचे रुग्ण गोड पदार्थासाठी ड्रायफ्रुट्सची बर्फी किंवा अंजीरचे लाडू खाऊ शकतात. यामुळे शरीराला ताकद मिळते. मात्र हे जास्त प्रमाणात खाऊ नये.

डार्क चॉकलेट

तुम्ही मधुमेह असून, डार्क चॉकलेटचे सेवन थोड्याफार प्रमाणात करु शकता. डार्क चॉकलेट हे अँटी-ऑक्सीडंटचे स्त्रोत आहे. याशिवाय बऱ्याच प्रमाणात फ्लेवनॉल्स असते. यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहणार आहे.

ओट्स खीर

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. हे ओट्स खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहू शकते. ओट्समुळे रक्तातील पातळी नियंत्रणात राहू शकते. तुम्ही दूध उकळून त्यात ओट्स टाकून खाऊ शकता. खीर गोड करण्यासाठी त्यात स्टेविया किंवा आर्टिफिशिअल स्वीटनलसुद्धा टाकू शकता. त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

स्मूदी

मधुमेहाचे रुग्णही गोड पदार्थात स्मूदी खाऊ शकतात. आपण फ्लेक्ससीड्स किंवा बेरीपासून तयार केलेले स्मूदी पिऊ शकता. यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. स्मूदी प्यायल्याने मिठाईची लालसा नाहीशी होते. तसेच रक्तातील साखरेचे नियंत्रण होते.

फळे

मधुमेहाचे रुग्ण फळ खाऊ शकतात कारण फळांमध्ये नॅचरल शुगर असते.याशिवाय फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसेच फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे तुमचे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते.त्यासाठी तुम्ही किवी,सफरचंद,संत्री आणि पपई या फळांचे सेवन करु शकता.


हेही वाचा – तुम्हीही मिठाचे सेवन जास्त करता का? तर त्यानंतर खा ‘हे’ ३ पदार्थ