Monday, May 29, 2023
घर मानिनी Health Diabetes Control : मधुमेहाला नियंत्रित करतील कडुलिंबाची पानं

Diabetes Control : मधुमेहाला नियंत्रित करतील कडुलिंबाची पानं

Subscribe

जगभरात जवळजवळ 42.2 कोटी लोक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात राहतात. त्याचसोबत प्रत्येक वर्षाला 14 लाख लोकांचा मृत्यू याच कारणास्तव होतो. ही आकडेवारी डब्लूएचओने दिला आहे. गेल्या काही दशकांपासून मधुमेहाच्या रुग्णाचा आकडा वेगाने वाढला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनचा रिपोर्ट असे सांगतो की, भारतात 18 वर्षापेक्षा अधिक वयातील 7.7 कोटी लोक टाइप-2 मधुमेहाने ग्रस्त आहे. औषधं आणि डॉक्टर यांच्या व्यतिरिक्त ब्लड शुगरला कंट्रोल करण्यासाठी हेल्दी डाएटचे खुप ऑप्शन आहेत. पण नैसर्गिक रुपात असे काही उपाय आहेत ज्याच्या माध्यमातून ब्लड शुगर कंट्रोल केली जाऊ शकते.

- Advertisement -

अशातच कडुलिंबाची पानं भले कडू असतील पण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याची पाने ते मूळांचा हेल्दी हर्ब म्हणून वापर केला जातो. याचा उपयोग सूज, त्वचा रोग, दातांच्या समस्या, ताप अशा विविध आजारांवर उपचार केला जातो. कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी केला जाऊ शकतो. तसेच ब्लड प्रेशर, हायरपरटेंशन आणि हाय कोलेस्ट्रॉल स्तरच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.

इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अॅन्ड फार्माकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कडुलिंब ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यास मदत करते. कडुलिंब हे ब्लड प्युरिफायर असून त्यामध्ये विटामिन बी, ए आणि सी सारखे आवश्यक पोषक तत्व असतात. कॅल्शिअम, लोह आणि फ्लेवोनॉइड्स सुद्धा भरपूर प्रमाणात असते.


- Advertisement -

हेही वाचा- Sudden Cardiac Arrest : महिलांमध्ये अचानक वाढतोय हृदयविकाराचा धोका

- Advertisment -

Manini