घरलाईफस्टाईलडायबिटीस असूनही बटाटा खातायं? मग अगोदर वाचा डॉक्टरांचा सल्ला

डायबिटीस असूनही बटाटा खातायं? मग अगोदर वाचा डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

डायबिटीस या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांना औषधांसोबत आहारातही पथ्य राखावे लागते. रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाव्यात किंवा खाऊ नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यात अनेकदा डायबिटीस बटाटा खावा की खाऊ नये याबाबतही मोठा संभ्रम असतो. कारण बटाट्यात मोठ्याप्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी बटाटा खावा की खाऊ नये याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ…

भारतात बटाटा सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. बटाटा हा भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक खाल्ला जाणारा लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. इतकेच नाही बटाट्यांचे चिप्स आणि फ्राईज देखील मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात.

- Advertisement -

मात्र बटाट्याबद्दल लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, हायकार्ब असलेले बटाटे डायबिटीसच्या रुग्णांसाठी योग्य नाहीत. पण संशोधनात डायबिटीसच्या रुग्णांसाठी बटाटे पूर्णपणे हानिकारक आहेत असे म्हणता येणार नाही. कोणताही पदार्थ ज्यापासून रुग्णाला अॅलर्जी होत नाही, ते पदार्थ डायबिटीसग्रस्त रुग्ण मर्यादित प्रमाणात खाऊ शकतो. डायबिटीसच्या रुग्णाला बटाटे खाल्ल्याने त्रास होत नसला तरी त्याचे योग्य सेवन करणे आवश्यक आहे. कारण यात अधिक पोषक तत्व आहेत. तज्ज्ञांच्या मते, बटाट्यामध्ये स्टार्च आढळतो, त्यामुळे स्टार्च नसलेल्या भाज्यांसोबत त्याचे सेवन करावे. तसेच प्रोटीन आणि व्हिटामिन्स असलेल्या पदार्थांमध्ये ते मिसळून खावे.

बटाटा आरोग्यासाठी महत्त्वाचा का आहे?

जमिनीत पिकवलेले बटाटे अगदी सहज उपलब्ध होतात. त्याची किंमत कमी असली तरी ते हजारो प्रकारात विकले जातात. म्हणूनच जगात सर्वत्र बटाट्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होतो. भाजी व्यतिरिक्त बटाटा स्नॅक्स म्हणून देखील खूप लोकप्रिय आहे. त्यातून अनेक प्रकारचे स्नॅक्स बनवले जातात.

- Advertisement -

पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक बटाट्यामध्ये आढळतात. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील शरीराला ताकद देतात. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही आढळतात.

एका बटाट्यामध्ये 168 कॅलरीज, चार ग्रॅम प्रथिने, 0.2 ग्रॅम फॅट, 39 ग्रॅम कार्ब्स, तीन ग्रॅम फायबर, 1.83 मिलीग्राम आयरन, 888 मिलीग्राम पोटॅशियम आणि 12 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतात. बटाट्यामध्ये आपल्या सर्वांना आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश आहेय. त्यामुळे साहजिकच आहे की हे पोषक घटक डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील आवश्यक आहेत. यामुळेच बटाटे मर्यादित प्रमाणात आणि कमी स्टार्चयुक्त भाज्या आणि प्रथिने यांसारखे हळूहळू पचणाऱ्या पदार्थांसोबत खावेत.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असतो, तेव्हा तो अन्नामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट सहज शोषून घेऊ शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आवश्यक प्रमाणात ओलांडते. त्याचवेळी ज्या लोकांना डायबिटीस नाही, त्यांच्या शरीरातील साखर वाढते तेव्हा स्वादुपिंड (पॅनक्रियाज) इन्सुलिन सोडण्याचे संकेत देते, त्यानंतर इन्सुलिन शरीरातील पेशींना साखरेचे उर्जेमध्ये रूपांतरित करण्यास मदत करू लागते.

परंतु डायबिटीसच्या बाबतीत, एकतर व्यक्तीचे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही (टाइप 1 मधुमेहाप्रमाणे) किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात आणि साखरेचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करू शकत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त होते आणि हळूहळू रक्तवाहिन्या खराब होऊ लागतात, ज्यामुळे भविष्यात हृदयविकार, अंधत्व आणि किडनीचे आजार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

बटाट्याचे सेवन किती करावे?

बटाटे हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे एक प्रकार आहेत. याचा अर्थ त्यात अधिक पोषक आणि अधिक फायबर असतात. साधे कार्बोहायड्रेट म्हणजे पिठापासून बनवलेले पॅकेज केलेले अन्न, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, नैसर्गिकरीत्या साखर आणि त्यापासून बनवलेले पदार्थ. मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरात एका लहान वाटीपेक्षा जास्त बटाट्याचे सेवन करू नये. सोप्या भाषेत सांगायचे तर, मधुमेही रुग्णांनी बटाट्याची करी खाल्ली तर ती ताटाच्या एक चतुर्थांश असावी. यासोबतच रुग्णांनी डाळी, हिरव्या भाज्या आणि इतर आरोग्यदायी गोष्टी खाव्यात.

आहार तज्ज्ञांच्या मते, डायबिटीसचे रुग्ण रक्तातील साखरेसाठी मानक डाइटचा भाग म्हणून बटाटे खाऊ शकतात, परंतु त्यांना फक्त त्यांच्या खाण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मधुमेहाच्या रूग्णांनी मीठ, तेल, मलई, चीज घालून तयार केल्या बटाट्याच्या भाजी ऐवजी हेल्दी स्वरूपात खावे. डायबिटीस रुग्ण हे भाज्या, मांस, मासे आणि कडधान्यांसह खाऊ शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल, तर कार्बोहायड्रेट देखील त्याच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त फायबर, प्रोटीन आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांसह बटाटा खावे पण त्याचे प्रमाण देखील लक्षात घेतले पाहिजे डायबिटीसच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन हेल्दी फॉर्ममध्ये केले पाहिजे. बटाट्याच्या चिप्स, फ्राइज किंवा तळून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.


कोरोना काळात खोके खाऊन, माजले बोके; आशिष शेलारांचे ठाकरेंवर टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -