मधुमेह अशी एक समस्या आहे ज्यामुळे सध्याच्या काळात बहुतांश लोक त्रस्त आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या आजारावर ठोस उपचार नाही. पण जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल केला तर तो कंट्रोल करता येऊ शकतो. थंडीच्या दिवसात तापमान कमी होतेच पण त्याचसोबत मेटाबॉलिज्म ही स्लो होतो. तुम्ही सुद्धा मधुमेहाचे रुग्ण असाल तर पुढील काही फूड्स थंडीत जरुर खा.
बाजरी
थंडीच्या दिवसात बाजरी पासून तयार करण्यात आलेले पदार्थ खावेत. कारण यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. डाएटमध्ये तुम्ही बाजरीची रोटी, लड्डू आणि खिचडी खाऊ शकता.
दालचिनी
दालचिनी मध्ये ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर याचे सेवन करू शकता. या व्यतिरिक्त हृदय रोगासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. तुम्ही चहामध्ये याचा समावेश करू शकता.
आवळा
आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. यामध्ये क्रेमियम भरपूर प्रमाणात असते. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बूस्ट होते. त्यामुळे तुम्ही आवळा खाऊ शकता.
गाजर
गाजर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दररोज गाजराचे सेवन करावे. याचा ज्यूस सुद्धा पिऊ शकता. अथवा सलाड खाऊ शकता.
हेही वाचा- हिवाळ्यात उपशीपोटी खा ‘हे’ पदार्थ शरीराला होतील फायदे