Monday, December 2, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीचाळीशीनंतरही तंदुरुस्त राहायचंय?मग खा हे पदार्थ

चाळीशीनंतरही तंदुरुस्त राहायचंय?मग खा हे पदार्थ

Subscribe

वयानुसार शरीरातील पोषक तत्वे कमी होत जातात. यासाठी निरोगी आरोग्यासाठी वाढत्या वयात सर्व पोषक तत्वांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक असते. शरीरात कोणत्याही घटकाची कमतरता किंवा त्याचा अतिरेक यामुळे शरीर कमकुवत बनते. ज्याने तुम्हाला आजार होण्याचा धोका संभवतो. अशावेळी वयाच्या चाळीशीनंतर आहारात प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्सयुक्त पदार्थ खाण्याची गरज असते. जाणून घेऊयात असे पदार्थ जे तुम्ही चाळीशीनंतर खायला हवेत.

- Advertisement -

मल्टीव्हिटॅमिन्स असलेले अंड तुम्ही खायला हवे. अंड्यात हाय प्रोटिन्स असतात, ज्यामुळे तुमचे मसल्स मुजबूत होतात आणि मेंदूचे आरोग्यही राखले जाते. अंड हे प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सचे भांडार आहे, अंड्यात असलेले ल्युसीन मसल्सला मजबूत करते.

फायबर आणि अँटी ऑक्सीडेंट्सने समृद्ध असे बेरीज तुम्ही खायला हवेत. बेरी हार्ट निरोगी ठेवण्यास मदत करते. वयानुसार त्वचेच्या अनेक समस्या उदभवतात त्या रोखण्यासाठी तुम्ही बेरीज खायला हव्यात. त्वचेचे चमक टिकवून ठेवण्यासाठी ब्लॅकबेरी, स्ट्राबेरी तुम्ही खाऊ शकता. बेरीज खाल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते.

- Advertisement -

ओमेगा 3 फॅटी ऍसिडने परिपूर्ण असे फॅटी फिश हार्ट आणि मेंदूचे कार्य सक्रिय ठेवतात आणि रोगांपासून संरक्षण करतात. फॅटी फिशमध्ये व्हिटॅमिन D असल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. वयोमानानुसार स्मरणशक्ती परिणाम होत असतो, विसरायला होत. यावर उपाय म्हणून तुम्ही फॅटी फिश खाऊ शकता.

पालक, मेथी, माठ यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्याने शरीराला अनेक फायदे होतात. जसे की रक्त वाढणे, गंभीर आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.

 

 


हेही पाहा : जिम -डाएट करुनही वजन कमी न होण्याची ही आहेत कारणे

Edited By – Chaitali shinde

- Advertisment -

Manini