शुगर फ्री-कार्बोनेटेड ड्रिंक डाएट कोकला अलीकडला काळात फार प्यायले जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, डाएट कोक शुगर फ्री आणि कॅलरी फ्री असले तरीही आरोग्यासाठी नुकसानदायक का असते? खरंतर डाएटमध्ये आर्टिफिशिल शुगर असते. ही साखर दातांना नुकसान आणि वजन वाढू शकते. या व्यतिरिक्त डाएट कोकमध्ये अॅसिड आणि कॅफेन असते. जे दातांना नुकसान, हृदयाच्या ठोकांचा वेग वाढणे आणि हाय ब्लड प्रेशरचे कारण ठरू शकते.
काही अभ्यासातून असे समोर आले आहे की यामुळे आरोग्यासंबंधित धोका वाढू शकतो. जी लोक आर्टिफिशिअल शुगरचे सेवन करतात त्यांच्यामध्ये टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका वाढला जातो. वैज्ञानिकांनी 9 वर्षांपर्यंत तज्ञांनी एक लाखांपेक्षा अधिक लोकांच्या डाएट आणि आरोग्याचे विश्लेषण केले. या अभ्यासात असे दिसले की, जी लोक प्रतिदिन 16-18 मिलीग्राम आर्टिफिशिअल स्वीटनरचे सेवन करतात त्यांच्यामध्ये कमी खाणाऱ्यांच्या तुलनेत मधुमेह विकसित होण्याची शक्यता 69 टक्क्यांनी वाढली जाते.
साइलेंट किलर आहे डाएट कोक
काही लोक डाएट कोकला एक हेल्दी ऑप्शन मानतात. मात्र संशोधन आणि अभ्यासातून याच्या संभावित आरोग्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकला आहे. डाएट कोकमध्ये एस्पार्टेम नावाचे एक आर्टिफिशिल शुगर असते. काही अभ्यासातून समोर आले आहे की, एस्पार्टेम डोकेदुखी, चक्कर येणे आणि ऐवढेच नव्हे तर जुन्या आरोग्यासंबंधितचे आजार वाढू शकतात. या व्यतिरिक्त वजन वाढणे, हृदय रोगासबंधित आजार आणि झोप येण्याची समस्या ही वाढू शकते.
हेही वाचा- French Fries खात असाल तर आधी हे वाचा