घरताज्या घडामोडीब्लड प्रेशरचा त्रास असल्यास काय खावे आणि काय टाळावे? वाचा

ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास काय खावे आणि काय टाळावे? वाचा

Subscribe

तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील ब्लड प्रेशरमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास काय खावे व काय टाळावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ‘हाय ब्लड प्रेशर’ आणि ‘लो ब्लड प्रेशर’ हा सामान्य आजार झाला आहे. घऱाघरात आज ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्ती आढळतात. पण हा असा आजार आहे की एकदा मागे लागला तर तो शेवटपर्यंत पाठ सोडत नाही. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाल्यास नियमित गोळ्या औषधांबरोबरच यावर निय़ंत्रण मिळवणे हा एकमेव उपाय आहे. त्यातही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील ब्लड प्रेशरमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास काय खावे व काय टाळावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जर तुमच्या रोजच्या डाएटमध्ये खारट, तेलकट,गोड, चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर तुम्हांला भविष्यात उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. तसेच असे अनेक फळ व भाज्या आहेत. जे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकतात. तर अशाही काही फळ भाज्या आहेत ज्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर वाढू शकते. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रोजचा डाएट प्लान बनवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

हाय ब्लड प्रेशर , काय खावे?

गहू, मूगाची डाळ, मसूर डाळ, पडवळ, शिंगाडा, टोमॅटो, दुधी भोपळा, कारल, हिरव्या पालेभाज्या, मोसमी भाज्यांचा जेवणात समावेश करावा. तसेच जेवणात जीऱ्याचा समावेश आवर्जून करावा.

- Advertisement -

काय टाळावे

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जेवणात लोणचं, खारट, अंडी, बटर, तेलकट पदार्थ, तूपकट, मसालेदार पदार्थ, मांस, केक- पिज्जासारखे जंक फूड, डबाबंद अन्नपदार्थ खाणे टाळावे.

डाएटमध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण कमी करावे.

दिवसात कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावे.

लो ब्लड प्रेशर असल्यास काय खावे?

लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी ८ तासांची झोप आवश्यक असते.

भरपेट खाणे टाळावे.

उपाशी राहू नये.

कडक पाण्याने आंघोळ करू नये.

भात, बटाटा, पास्ता, आणि ब्रेड व पाव अशा पदार्थांपासून लांब राहावे.

ठराविक वेळाच्या अंतराने खावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -