घरलाईफस्टाईलसुदृढ आरोग्यासाठी असा असावा डाएट प्लॅन

सुदृढ आरोग्यासाठी असा असावा डाएट प्लॅन

Subscribe

ल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लॅन बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लॅन बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लॅन फिक्स करा आणि बॉडी बनवा.

ब्रेकफास्ट सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा. त्यासाठी ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास कोमट दूध किंवा एक कप चहा किंवा एक कप कॉफी किंवा ताजा रस यासोबत एक प्लेट पोहे किंवा उपमा, दोन अंडी आम्लेट किंवा दोन उकडलेली अंडी अथवा जॅम वा बटरसोबत तीन ब्राऊन ब्रेड स्लाइस.

- Advertisement -

दुपारचे जेवण दुपारचे जेवण हे सर्वसमावेशक असावे. यात गोड दही एक वाटी, 2-3 चपात्या, एक वाटी भात, हिरव्या भाज्या, डाळ, सलाड

संध्याकाळचे स्नॅक्स दुपारचे जेवण योग्य वेळेत घेतल्यास संध्याकाळच्या सुमारास थोडीफार भूक लागतेच. अशावेळी जड पदार्थ खाण्यापेक्षा दोन स्लाईस ब्राऊन ब्रेड तसेच एक ग्लास बनाना शेक किंवा कस्टर्ड अ‍ॅपल किंवा मँगो शेक अथवा एक कप चहा किंवा कॉफी घेऊ शकता.

- Advertisement -

रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण फार कमी घ्यावे. रात्रीच्या जेवणात एक बाऊल दही, तसेच १-२ चपात्या, सुकी भाजी, एक बाऊल डाळ, एक प्लेट सलाड. रात्री जेवल्यानंतर १५-२० मिनिटांनंतर मीठ आणि साखरेशिवाय कोमट लिंबूपाणी प्यावे.

तसेच जेवल्यानंतर दोन ते अडीच तासांनी झोपावे. कारण या काळात जेवण चांगले पचते. तसेच पचनसंबंधी समस्या दूर होतात.

सौंदर्यवर्धक काकडी

काकडी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी चेहर्‍यावर चमक आणते. काकडीपासून आपण घरच्या घरी फेस पॅक तयार करु शकतो. बघूया चमकदार त्वचेसाठी काकडीचे काही घरगुती फेस पॅक

cucumber

  • काकडी घेऊन तिचे बारीक काप करुन घेणे. त्यानंतर त्यात १ चमचा ओट्स, १ चमचा दही आणि १ चमचा मध एकत्र करुन मिक्सरमध्ये फिरवून घेणे. हा तयार झालेला पॅक चेहरा आणि मानेवर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुऊन टाका.
  • काकडीची पेस्ट तयार करुन घेणे. त्यात लिंबाचा रस आणि अंड्याचा पांढरा भाग मिसळा. हे तयार मिश्रण ड्राय स्कीनवर लावल्याने त्वचा नरम पडेल.
  • प्रथम काकडीची पेस्ट तयार करुन त्यामध्ये ५ चमचे मध आणि लिंबाचा रस मिसळून एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिसळून १५ मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. यामुळे चेहरा चमकतो.
  • मुलतानी मातीमध्ये ३ चमचे काकडीचा रस आणि १२ थेंब गुलाबपाणी मिसळून मिश्रण एकत्र करुन घेणे. हा तयार पॅक १४ मिनिटे त्वचेवर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. याने पिंपल्स नाहीसे होतात.
  • काकडीच्या रसात १ चमचा एलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍यावरील ग्लो वाढेल.
  • २ चमचे बेसनमध्ये २-३ चमचे काकडीचा रस मिसळा. हे मिश्रण २० मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. नंतर गरम पाण्याने चेहरा धुऊन टाका. याने त्वचेवरील डाग नाहीसे होतील.
  • काकडीच्या पेस्टमध्ये दही मिसळा. चेहर्‍यावर या मिश्रणाने मालिश करा. १०-१५ मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हे ड्राय स्कीनवर उपयोगी ठरेल. तसेच पिंपल्सची समस्याही दूर होईल.
  • काकडी आणि ओट्सची पेस्ट तयार करून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावून १५ मिनिटांनंतर चेहरा गार पाण्याने धुऊन टाका. डेड स्कीनसाठी हे फायदेशीर ठरेल.
  • काकडी आणि टोमॅटो मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा. १५-२० मिनिटाने गार पाण्याने चेहरा धुऊन टाका. त्याने त्वचा उजळेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -