स्मार्टवॉच आजकाल ट्रेंन्डमध्ये आहेत. मात्र त्याचा सतत वापर केल्याने ते अस्वच्छ होऊ लागते आणि त्याची चमक दूर होते. स्मार्टवॉच अस्वच्छ झाल्याने तुम्ही ते स्वच्छ कसे कराय याच बद्दलच्या काही टीप्स आपण आज पाहणार आहोत.
स्मार्टवॉच अस्वच्छ का होते?
स्मार्टवॉच आणि सामान्य घड्याळ्याच्या पट्ट्यांमध्ये अंतर असते. बहुतांश स्मार्टवॉचचे पट्ट्यांचा रंग लाइट असतो. त्याच कारणास्तव अस्वच्छ होतात. सुरुवातीला स्मार्टवॉचला लागलेले डाग दिसून येत नाही आणि एका काळानंतर ते जाता जात नाहीत.
असे स्वच्छ करा स्मार्टवॉच
-स्मार्टवॉच स्वच्छ करण्यासाठी सर्वाधिक सोप्पा पर्याय म्हणजे तुम्ही डिटर्जेंटचा घोलची मदत घ्या. सर्वात प्रथम एका लहान बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात थोडसं डिटर्जेंट टका.
-आता कॉटनच्या मदतीने लिक्विडला स्मार्टवॉचच्या पट्ट्याला लावा. जेणेकरुन ते सहज स्वच्छ होतील. अखेर संपूर्ण घड्याळ्याला एका सुक्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या आणि युज करा.
स्मार्टवॉचवर लागलेले डाग असे करा स्वच्छ
-स्मार्टवॉचवर लागलेले डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी पाणी गरम करा आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका.
-त्यानंतर लिंबूच्या रसाचे काही थेंब सुद्धा लिक्विडमध्ये टाकू शकता. असे केल्याने तुमच्या स्मार्टवॉचवर लागलेले डाग निघून जातील.
हेही वाचा- फ्रीजच्या डोअरमधून आवाज येत असेल तर वापरा ‘या’ टिप्स