घरलाईफस्टाईलदुपारच्या जेवणानंतर झोप घेताय? मग 'हे' नक्की वाचा!

दुपारच्या जेवणानंतर झोप घेताय? मग ‘हे’ नक्की वाचा!

Subscribe

बऱ्याच जणांना दुपारचे जेवण झाले का आळस येतो. मग मस्त डुलकी काढावी, असे देखील वाटते. पण, ही दुपारची झोप फार धोकादायक आहे. जर तुम्हीही दुपारचे जेवण झाल्यानंतर डुलकी काढत असाल तर आधी हे वाचा. यामुळे तुमची झोपच उडेल. कारण दुपारची जेवणानंतरची झोप शरीरासाठी फार वाईट असते.

वजन वाढते

- Advertisement -

जेवणानंतर दुपारी झोपल्यामुळे शरिरात मेदाचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण वाढते. दुपारी झोपेच्या अधिक प्रमाणामुळे आपले वजन वाढू लागते आणि वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

मधुमेहाचा धोका वाढतो

- Advertisement -

दुपारच्या झोपेमुळे पचन क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात मधूमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारी डुलकी टाळणे फार गरजेचे आहे.

त्वचा रोगाला आमंत्रण

अनेक वेळेस रक्त दूषित होण्याचे कारण हे दुपारची झोप हेही असू शकते. कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. त्यासोबतच यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

दिवसभर आळस राहतो

दुपारच्या जेवणानंतर झोपल्याने खूप वेळ झोप लागते. त्यामुळे शरीर जड होते. तसेच दिवसभर आळस राहतो.

कफदोष वाढतो

दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. छातीत कफ निर्माण होतो. यामुळे श्वास घेण्यास देखील त्रास होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -