घरताज्या घडामोडीDiwali 2021: यंदाच्या दिवाळीत झटपट बनवा केशर मूग डाळ बर्फी

Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत झटपट बनवा केशर मूग डाळ बर्फी

Subscribe

सध्या सर्व लोकं दिवाळीची तयारी करण्यात व्यस्त आहेत. दिवाळी हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा सण आहे. दिवाळीत फराळ बनवण्याची परंपरा बऱ्याच काळापासून सुरू आहे. या दिवसात तोंड गोड करण्यासाठी खास मिठाई देखील बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यंदाच्या दिवाळीत झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारी मिठाईची रेसिपी सांगणार आहोत. या मिठाईचे नाव केशर मूग डाळ बर्फी असे आहे. तर मग केशर मूग डाळ बर्फी कशी बनवतात ते जाणून घेऊयात…

साहित्य

- Advertisement -
  • भिजवलेली मूग डाळा अर्धा कप
  • साखर अर्धा कप
  • दूध दीड वाटी
  • गरजेनुसार तूप
  • केशरचे १० धागे
  • १ चमचा पिस्ता

कृती

  • केशर मूग डाळ बर्फी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पिस्ता लांब आकाराचे कापा.
  • एका वाटीत १ चमचा गरम दूध घ्या आणि त्यात केशर भिजवण्यासाठी टाका.
  • मग पाण्यातून मूग डाळा काढून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. जास्त बारीक करून नका.
  • त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून त्यात तूप टाका.
  • मग त्यात मूग डाळ टाकून १० ते १५ मिनिटे फ्राय करा.
  • मूग डाळ व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचा सुगंध येईल. त्यानंतर एका प्लेटमध्ये मूग डाळ काढून घ्या.
  • मग कढाईत दूध आणि सारख टाकून व्यवस्थित दोन्ही मिस्क होईपर्यंत हलवत राहा आणि त्यानंतर त्यात भिजवलेले केशरचे मिश्रण टाका.
  • हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात डाळ टाकून घट्ट होईल पर्यंत शिजवा.
  • त्यानंतर एका ट्रेमध्ये तूप लावून सर्व मिश्रण व्यवस्थित त्यात टाकून बर्फीसाठी सेट करा. यावेळी सेट करताना त्याच्यावरती पिस्ताचे काप टाका.
  • थोडा वेळ झाल्यानंतर बर्फीच्या आकारात कापा. अशा प्रकारे तुम्ही झटपट केशर मूग डाळ बर्फी तयार करू शकता.

हेही वाचा – दिवाळीतला डाएट प्लान- काय खायचं आणि काय टाळायचं?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -