मिठाई बनवण्यासाठी अनेकजण बाजारातून मावा खरेदी करुन आणतात. तर काहीजण घरच्या घरी शुद्ध मावा तयार करतात. सण-समारंभाच्या काळात बाजारात भेसळयुक्त मावा आढळतो. या भेसळयुक्त माव्यामुळे तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा स्वाद खराब होतो. सोबतच अशाप्रकारचा भेसळयुक्त मावा आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक सिद्ध होतो. अशावेळी तुम्ही देखील घरच्या घरी मावा तयार करु शकता. शिवाय जर तुम्हाला बाजारातून मावा खरेदी करायचा असेल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता देखील तपासून पाहा.
बाजारातील माव्याची शुद्धता कशी तपासावी?
- Advertisement -
- सर्वात आधी माव्यामध्ये थोडी साखर टाकून तो कढईत गरम करुन घ्या. जर थोड्यावेळानंतर हे पाणी सोडू लागले तर मावा भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होईल.
- खरा मावा गरम झाल्यानंतर तेलकट दिसू लागतो आणि त्याच्या सुगंध देखील येतो.
- तसेच बाजारातील मावा खरेदी करताना तो थोडा चाखून पाहा जर मावा तोंडामध्ये चिकटला म्हणजे तो भेसळयुक्त आहे. खरा मावा कधीही तोंडामध्ये चिकटत नाही.
- खरा मावा रगडल्यानंतरही तुटत नाही. मात्र, भेसळयुक्त मावा रगडल्यावर लगेच तुटतो.
- खरा मावा पाण्यामध्ये लगेच एकजीव होतो. मात्र, भेसळयुक्त मावा पाण्यामध्ये एकजीव व्हायला वेळ लागतो.