घरदिवाळी 2023Diwali 2023: जगातील 'या' तीन देशात अनोख्या पद्धतीने साजरी होते दिवाळी

Diwali 2023: जगातील ‘या’ तीन देशात अनोख्या पद्धतीने साजरी होते दिवाळी

Subscribe

दिवाळीचा सण भारतात फार उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. वर्षभर या सणाची वाट पाहिली जाते. याच दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते. तेव्हा ते आल्याच्या आनंदात लोकांनी दिवे लावून स्वागत केले होते. दिव्यांच्या या सणात संपूर्ण भारत दिव्यांनी उजळून जातो. खासकरून अयोध्येत खास दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या सणाला लोक वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतात. दिवाळीचा सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अन्य देशांमध्ये सुद्धा धुमधडाक्यात साजरा केला जातो.

- Advertisement -

जापान
जापान मध्ये दिवाळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथील लोक बागेत जाऊन दिवाळीचा सण साजरा करतात. दिव्यांऐवजी ते रंगीत लालटेन वापरतात आणि झाडांनाही सजावट करतात. जापानमधील लोक असे म्हणतात की, असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते. दिवाळीच्या दिवशी लोक रात्रभर नाचगाणे करतात आणि सणाची मजा लूटतात.

Diwali Celebration in Malaysia I Where to go in Malaysia on Diwali

- Advertisement -

मलेशिया
मलेशियात दिवाळीच्या सणाला हरी दिवाळी म्हणून ओळखले जाते. मलेशियातही दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. पण येथे केवळ हिंदू धर्मियच दिवाळीचा सण साजरा करतात. आकडेवारीनुसार मलेशियाती लोकसंख्या एकूण 3.5 कोटी आहे. त्यापैकी 21 लाख हे हिंदू आहेत. येथील लोक आपल्या घराबाहेर कँन्डल आणि दिवे लावतात.

श्रीलंका
श्रीलंकेला रामायणाच्या काळाच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हिंदू लोक राहतात. येथील लोक दिवाळीला लॅम क्रियॉन्ग नावाने साजरा करतात. येथे दिवाळी साजरी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. लोक लॅम्पमध्ये मेणबत्त्या, एक नाण आमि धूप ठेवतात. त्यानंतर ते नदीत सोडतात.


हेही वाचा- देशभरात असते दिवाळी मात्र ‘या’ राज्यात असतो अंधार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -