दिवाळीचा सणाला सुरुवात झाली असली तरीही तुम्ही घरी विविध पदार्थ बनवता. खासकरून दिवाळीला फराळ आवर्जुन बनवला जातो. पण फराळातील एखादा नवा पदार्थ ट्राय करून पहायचा असेल तर चंपाकळीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा.चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तरपणे.
- Advertisement -
साहित्य-
1 वाटी मैदा,
2 चमचे तेल किंवा तूप
1 वाटी साखर
तळण्यासाठी तेल
- Advertisement -
कृती
-मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा व लागेल एवढेच पाणी घालून घट्ट गोळा करून घ्या आणि ते पीठ 10 मिनिट झाकून ठेवा.
-आता पीठाचा एक गोळा घेऊन तो पोळीच्या आकारात लाटा. त्यावर काठ सोडून मध्यभागी चाकूने चिरा करून घ्या. काठावर थोडेसे पाणी लावून एका बाजूने ती पोळी रोल करत जा.
-गरम झालेल्या तेलात तयार केलेली चंपाकळी तळून घ्या. अशाप्रकारे तयार होईल तुमची खुसखुशीत चंपाकळी.