दिवाळीला आपण करंज्या तर बनवतोच. पण यंदा करंजीऐवजी चिरोट्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर.
साहित्य
250 ग्रॅम मैदा
4 टेबलस्पून बारिक रवा
2 टेबलस्पून पातळ तूप
200 मिली पाणी
चिमूटभर मीठ
तेल तळण्यासाठी
1 वाटी साखर
1/2 वााटी पााणी
2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
2 टेबलस्पून तूप साठा तयार करण्यासाठी
कृती
-प्रथम आपण एका वाटी मध्ये मैद आणि,रवा घेत त्यात चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. दुसऱ्या बाजूला तूप गरम करावे व त्या पीठात घालावे. गरम केलेले तूप चिरोट्यात घातल्याने ते खुसखुशीत होतात. आता पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
-आता साठा तयार करण्यासाठी 2 टेबलस्पून तूप आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालून चांगले फेटून घ्यावे.
-अर्धा तास झाल्यावर पीठाचे गोळे करून घ्यावे. तुम्ही पीठाच्या गोळ्यात रंग घालून लाटू शकता. अशा प्रकारे तीन पोळ्या लाटून प्रत्येक पोळीवर तयार केलेला साठा हाताने पसरुन लाना. साठा व्यवस्थितीत पसरुन त्याचा घट्ट रोल करून घ्या आणि सुरीने कट करून घ्या.
रोल करून झाल्यावर हलक्या हाताने दाबून लाटून घ्या. असे केल्याने खूप छान लेअर येतात. लाटून झाल्यावर कढईत तेल गरम करत ठेवावे व बारीक गॅसवर तळून घ्यावे. तळून झाल्यावर गॅसवर एक कढाई ठेवा त्यामधे 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालून पाक करून घ्यावा .पाकात चिरोटे दोन्ही बाजूने डिप करून लगेच काढून घ्यावे जास्त वेळ पाकात ठेऊ नये. जर तुम्हाला पाक आवडत नसेल तर तुम्ही चिरोट्यावर वरुन पिठीसाखर डस्ट करू शकता. अशा प्रकारे तयार होईल तुमची चिरोट्याची रेसिपी.