Monday, February 19, 2024
घरमानिनीBeautyDiwali 2023: फेस्टिव्ह ग्लोसाठी 'या' खास ब्युटी टिप्स

Diwali 2023: फेस्टिव्ह ग्लोसाठी ‘या’ खास ब्युटी टिप्स

Subscribe

दिवाळीच्या सणासाठी फार काही दिवसच राहिले आहेत. यावेळी आपण सुंदर दिसावे म्हणून महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रिटमेंट किंवा घरगुती उपाय करतात. जर तुम्ही योग्य ब्युटी ट्रिटमेंट घेत असाल तर एक्ने, ड्रायनेस सारख्या समस्या दूर होऊ शकतात आणि नैसर्गिक रुपात तुमच्या त्वचेला ग्लो येऊ शकतो. खरंतर सणासुदीचा काळ हा स्वत:ला आनंदित ठेवण्याचा असतो.

त्यामुळे दिवाळीत स्किन केअर कशी करावी याचा विचार करत असाल तर पुढील काही ब्युटी टिप्स जरुर तुमच्या कामी येऊ शकतात. यासाठी थेट पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या काही टिप्सने त्वचेवर ग्लो मिळवू शकता.

- Advertisement -

DIY skincare tips for that festive glow this Diwali, courtesy Shahnaz  Husain - The Economic Times

दिवाळीसाठी परफेक्ट लूकसाठी खास ब्युटी टिप्स
यंदाच्या दिवाळीवेळी त्वचेला ग्लो देण्यासाठी आपल्या बिझी शेड्यूलमधून काही वेळ जरुर काढा. यासाठी केवळ 10 मिनिटे सुद्धा पुरेशी आहेत. नेहमीच लक्षात ठेवा की, ब्युटी प्रोडक्ट्स हे तुम्हाला दीर्घकाळ ग्लो देत नाहीत. उलट तुमची त्वचा यामुळे डॅमेज होऊ शकते. त्यामुळे एक क्लिन डाएटची सुद्धा गरज असते. तर जाणून घेऊयात सुंदर स्किनसाठी कसा असावा स्किन केअर रुटीन.

- Advertisement -

-सुंदर त्वचेसासाठी सर्वात प्रथम क्लेंजिग करणे फार महत्त्वाचे आहे
-मऊ त्वचेसाठी त्वचेला एक्फोलिएट जरुर करा
-नॅच्युरल मॉइश्चराजरसाठी नाइट क्रिमचा वापर करा
-त्वचेसंबंधित अधिक समस्या येत असतील तर स्किन टोनरचा वापर करा
-फेस मिस्ट नेहमीच आपल्या सोबत ठेवा
-एका उत्तम पील-ऑफ मास्कच्या मदतीने त्वचेला डिटॉक्स करू शकता
-ग्लो दीर्घकाळ टिकून रहावा म्हणून आपल्या स्किननुसार रिफ्रेशिंग फेशियल करा


हेही वाचा- फंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

- Advertisment -

Manini