यावर्षी दिवाळीचा उत्साह आणि आनंद सर्वत्र दिसत आहे. दिवाळीनिमित्त देशभरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी सुद्धा लगबग सुरु झाली आहे. दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्याच घरात फराळ करण्याची लगबग सुरु होते, चकली, चिवडा, करंजी, लाड, शंकरपाळ्या, अनारसे आणि इतर गोड पदार्थ घरात बनवले जातात. दिवाळीच्या दिवसात जरा जास्तच गोड पदार्थ खाल्ले जतात. मात्र, सर्व पदार्थ जास्त प्रमाणात खाणं तुमच्या आरोग्यासाठी किती योग्य आहे हे जाणून घ्या.
दिवसाळीच्या दिवसात या गोष्टींचे पालन करणं आरोग्यदायी
- Advertisement -
- दिवसाळीचा फराळ बनविताना तेलाचा आणि साखरेचा वापर कमी करा.
- दिवाळीत रोजच्या जेवणातला आहार चौरस असायला हवा. जेवणाला पर्याय म्हणून फराळ करू नका. एखाद वेळी जेवणात एक पोळी किंवा भात कमी खाहून तुमच्या आवडीचा पदार्थ खाऊ शकता.
- दिवाळीत तेलापासून बनवलेले पदार्थ आणि थंडी यामुळे शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते पण त्यामुळे अपचन, होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
- नियमित व्यायाम करा
- अशाप्रकारे दिवाळीच्या दिवसांत तुमचे आवडते पदार्थसुद्धा खा आणि आरोग्यही सांभाळा.