सध्या दिवाळी पार्टीचा ट्रेंन्ड सुरु आहे. प्रत्येकजण आपल्या घरी किंवा फार्म हाउसवर फॅमिली अथवा मित्रमैत्रीणींसोबत गेट टु गेदरसाठी एखादी पार्टी होस्ट करतात. यासाठी आमंत्रित केलेले पाहुणे नटून थटून येतात. तुम्हाला सुद्धा दिवाळी नाइट पार्टीसाठी जायचे असेल तर पुढील काही स्लिट कट ट्रेस नक्की ट्राय करू शकता. जेणेकरुन तुम्ही पार्टीमध्ये स्लिम आणि स्टाइलिशही दिसाल.
-स्लिट कट को-ऑर्ड सेट
पार्टत स्टाइल करण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे आउटफिट्स मिळतील. पण जर तुम्हाला काही युनिक आणि हटके ट्राय करायचे असेल तर स्लिट कट को-ऑर्ड सेट नक्की ट्राय करू शकता. अथवा शिमर किंवा सीक्वेंस वर्क असणारा स्लिट कट ड्रेसला स्टाइल करू शकता.
-थाय हाइ स्लिट कट ऑफ शोल्डर ड्रेस
दिवाळीीच्या सणावेळी अथवा पार्टीला जायचे असेल तर तुम्ही थाय हाइ स्लिट कट ऑफ शोल्डर ड्रेस वेअर करू शकता. यामध्ये तुम्ही सुंदर दिसाल. ब्लॅक रंगातील थाय हाइ स्लिट पार्टीत तुम्हाला परफेक्ट लूक देईल. या कलरमुळे तुम्ही स्लिमही दिसाल.
-सिंपल स्लिट ड्रेस
जर पार्टीसाठी सिंपल लूक क्रिएट करायचा असेल तर यासाठी तुम्ही सिंपल स्लिट ड्रेस नक्की ट्राय करू शकता. सिंपल जरी दिसत असला तरीही तुम्ही त्यावर एक्सेसरीज वेअर केल्यास स्टाइलिश दिसाल. या व्यतिरिक्त फॅन्सी बेल्टही वेअर करू शकता. या ड्रेसवर तुम्ही बोल्ड मेकअप करा.
हेही वाचा- Diwali 2023: यंदाच्या दिवाळीला ‘हे’ फॅशन ट्रेंन्ड्स नक्की ट्राय करा