Saturday, December 9, 2023
घरमानिनीKitchenDiwali 2023 : फराळ बिघडू नये म्हणून वापरा 'ही' ट्रिक

Diwali 2023 : फराळ बिघडू नये म्हणून वापरा ‘ही’ ट्रिक

Subscribe

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आवडीचा विषय पहिला येतो तो म्हणजे फराळ. प्रत्येक घरातील महिला कुटुंबाच्या आवडीप्रमाणे फराळातील हे पदार्थ बनवतात. रव्याचा लाडू, बेसणाचा लाडू आणि करंज्या हे पदार्थ दिवाळीत महत्त्वाचे असतात. मात्र हे बनवण्याची अनेकांची पद्धत वेगळी असते. हे पदार्थ बनवताना अनेकदा चुका होतात आणि पदार्थ नीट बनत नाही. यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करा आणि हे पदार्थ परफेक्ट करा.

Maharashtrian Karanji Recipe (Gujiya) - A Delicious Diwali Sweet by Archana's Kitchen

- Advertisement -
 • करंजा तळताना अनेकदा त्या तेलात फुटतात. यामुळे त्यातील सारण तेलात पसरते आणि सर्व तेल खराब होतं.
  असे होऊ नये म्हणून करज्यांच्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे.
 • शक्य असल्यास करंजी करताना मोहन चांगल्या तुपाचे घालावे. तूप नसेल तेलही चालते. आता मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे.
 • करंजीसाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी ते सुती कपड ओला करुन त्यात गुंडाळून ठेवा.

Rava Laddu Recipe | How to make Rava Laddu at home | Suji ke Laddu | Rava Ladoo Preparation | Vismai Food

 • रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे, यामुळे रवा छान फुलतो आणि रव्याला छान चवही येते.
 • रवा लाडू चविष्ट होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट मिक्स पावडर मिक्स करावा आणि त्यात रवा घालावा. त्यामुळे लाडू मऊ होतो.

Easy Besan Ladoo Recipe | Besan ke Laddu - Yummy Tummy

- Advertisement -
 • बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन चांगले भाजून घ्या, त्यावर एका वाटीला एक चमचा दूध शिंपडावे, यामुळे लाडू चविष्ट होतात.
 • बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट झाल्यानंतर एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घालावी ज्यामुळे लाडूला चांगली चव येते.
 • बेसनाच्या लाडूसाठी तूपाचे प्रमाण योग्य असावे अन्यथा लाडू खूप सैल नाहीतर जास्त कडक होतात.

 


हेही वाचा :

Diwali 2023: यंदाच्या दिवाळीला बनवा चंपाकळी

- Advertisment -

Manini