सणासुदीला वजन नियंत्रणात कसे ठेवायचे असा प्रश्न बहुतांश लोकांना पडतो. अशातच एका बाजूला विविध पदार्थ बनवले जात असल्याचा वास येत राहतो तर दुसऱ्या बाजूला आपण ते पदार्थ खाण्यासाठी स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. दिवाळीला गोड पदार्थ अधिक खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे सणाच्या दिवसात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे पाहूयात.
शरिराला डिटॉक्स करत रहा
बाहेरचे तळलेले पदार्थ, गोड पदार्थांमुळे शरीरात टॉक्सिंस जमा लागतात. टॉक्सिंस जमा झाल्याने वजन वाढले जाते आणि तब्येत बिघडली जाते. अशातच सकाळ-संध्याकाळी शरिराला डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक बनवून प्या.
गरम पाणी प्या
प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही एखादे मील खाता त्याच्या 20 मिनिटानंतर तुम्ही हलके कोमट पाणी प्या. ते खाल्ल्याने आपण खाल्लेले फूड व्यवस्थितीत पचले जाते. त्याचसोबत वजन कंट्रोल मध्ये राहते.
पोर्शन कंट्रोल
काही वेळेस गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने जेवढी समस्या होत नाही तेवढी समस्या अधिक खाल्ल्याने होते. त्यामुळे सणासुदीला आपल्या आवडीचे पदार्थ जरूर खा. पण पोर्शन कंट्रोलकडे सुद्धा लक्ष द्या.
शुगर ड्रिंक्सपासून दूर रहा
अधिक शुगर ड्रिंक्सचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे ते पिणे टाळावे. या ऐवजी तुम्ही ज्यूस, जलजीरा किंवा नॅच्युरल ड्रिंक्स पिण्यावर लक्ष द्या.
हेही वाचा-हिवाळ्यात उपशीपोटी खा ‘हे’ पदार्थ शरीराला होतील फायदे