दिवाळीमध्ये फराळ, रांगोळी, रोषणाई, फटाके, दिवे यांच्यासोबतच उटण्याला देखील विशेष महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे. असं म्हणतात की, दिवाळीच्या काळात हिवाळा ऋतू सुरू होतो. ज्यामुळे आपल्या शरीरावरील त्वचा हळूहळू कोरडी होते. त्यामुळे त्वचेला तजेलदार आणि तेजस्वी करण्यासाठी दिवाळीत उटणे लावले जाते.
पूर्वीच्या काळी अनेकजण नियमीत उटण्याचा वापर करायचे. तसेच अलीकडे देखील अनेकजण त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी बाजारातील आयुर्वेदिक उटण्याचा वापर करतात.
पंचगव्याचा देखील करा वापर
गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टी एकत्र करून पंचगव्य तयार केले जाते. अलीकडे पंचगव्य बाजारामध्ये विकतही मिळते. अनेकजण दिवाळीत पंचगव्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. दिवाळीच्या पहाटे उटणे लावण्यापूर्वी संपूर्ण शरीराला पंचगव्य लावले जाते.
असं म्हणतात की, पंचगव्य लावल्याने शरीराचे शुद्धीकरण होते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते, असे मानले जाते. तसेच यामध्ये अनेक औषधी गुण देखील असतात, ज्यामुळे अनेक रोगांपासून आपले रक्षण होते. पूर्वी देखील कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीर शुद्ध करण्यासाठी पंचगव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा.
हेही वाचा :